शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात सर्वपक्षीय बंडखोरीचे ग्रहण ; उमेदवारांचे धाबे दणाणले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 19:04 IST

पुणे शहर आणि ग्रामीण भागात महायुतीसोबत महाआघाडीलाही बंडखोरीचे ग्रहण लागले असून कोणत्याही राजकीय पक्षाला बंडखोरांना थोपवणे शक्य झालेले दिसून येत नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांचे धाबे दणाणले असून या बंडोबांचे बंड थंड कसे करायचे याच चिंतेत अनेकजण  आहेत. 

पुणे : पुणे शहर आणि ग्रामीण भागात महायुतीसोबत महाआघाडीलाही बंडखोरीचे ग्रहण लागले असून कोणत्याही राजकीय पक्षाला बंडखोरांना थोपवणे शक्य झालेले दिसून येत नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांचे धाबे दणाणले असून या बंडोबांचे बंड थंड कसे करायचे याच चिंतेत अनेकजण  आहेत. 

याची सुरुवात कसबा पेठ मतदार संघातून झाली असून तिथे भाजपच्या मुक्ता टिळक यांना शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी आव्हान दिले आहे. शहरात शिवसेनेला लढण्यासाठी एकही जागा न दिल्याने धनवडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.तिथेच काँग्रेसच्या अरविंद शिंदेसमोर काँग्रेसचा पाठिंबा असणारे रवींद्र धंगेकरही मैदानात उतरणार आहेत. दुसरीकडे पर्वतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार  अश्विनी कदम यांना काँग्रेसच्या आबा बागुल यांचे आव्हान असणार आहे. पाच टर्म नगरसेवक असलेल्या बागुल यांनी उद्या अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

 मावळमध्ये तर वातावरण तणावग्रस्त असून भाजपच्या बाळा भेगडे यांच्यासमोर आता राष्ट्रवादीत गेलेले पण मूळचे भाजपचे असलेले सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीतून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तिथेही जोरदार लढत बघायला मिळेल. खडकवासला मतदारसंघात भाजपच्या भीमराव तापकीर यांच्यासमोर शिवसेनेच्या रमेश कोंडे यांनी उमेदवारी दाखल केली असून तिथेही संघर्ष उभा राहणार आहे. 

अजून अर्ज दाखल करण्यास एक दिवस असल्यामुळे अजूनही बंडखोर वाढू शकतात आणि माघार घेण्यासाठी वेळ असल्यामुळे काही उमेदवारी मागेही घेऊ शकतात. पण सध्या तरी पुण्याचे चित्र बघितल्यास तुल्यबळ प्रतिस्पर्धी आणि बंडखोर या दोघांचेही दडपण समोरच्या उमेदवार असणार आहे. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकkasba-peth-acकसबा ( कस्बा पेठ )khadakwasala-acखडकवासला