शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महा ई-सेवा केंद्रावर छापा, बोगस आधार नोंदीप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 02:43 IST

चाकण येथे महा ई-सेवा केंद्रावर पोलीस आणि प्रशासन यांनी छापा टाकत बोगस आधार नोंदणी केल्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. बोगस आधारकार्ड आणि आधारकार्डसाठी जादा रक्कम घेत असल्याच्या लेखी तक्रारी जिल्हा अधिकारी आणि खेड उपविभागीय अधिकारी यांच्या कडे तक्रारी आल्या होत्या.

राजगुरुनगर : चाकण येथे महा ई-सेवा केंद्रावर पोलीस आणि प्रशासन यांनी छापा टाकत बोगस आधार नोंदणी केल्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. बोगस आधारकार्ड आणि आधारकार्डसाठी जादा रक्कम घेत असल्याच्या लेखी तक्रारी जिल्हा अधिकारी आणि खेड उपविभागीय अधिकारी यांच्या कडे तक्रारी आल्या होत्या. यादी दखल घेत उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.चाकण येथे वेदांत संकुल नावच्या इमारतीत गाळा, नंबर १६ मध्ये महा ई-सेवा केंद्रचालक नागरिकांकडून पैसे घेऊन कोणतेही कागदपत्र न घेता त्यांना आधार कार्ड नोंदणी करीत होता.याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. यांची शहानिशा करण्यासाठी नायब तहसीलदार लता चंद्रकांत वाजे, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, इतर पोलीस कर्मचाºयांसह सापळा रचला. त्यानुसार पोलिसांनी कार्तिक रमेश देशमुख (वय १९, रा. भुजबळ आळी, चाकण) याला याबाबतची ती माहिती सांगून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याच्याकडे ५०० रुपयांची नोट देऊन, नोट क्रंमाक घेऊन त्याच्याकडे कोणतेही आधार कार्ड काढण्यासाठी योग्य ती कागदपत्रे दिली नाही. तसेच त्याला आधार कार्ड काढण्यासाठी वेदांत संकुल येथे पाठविले.कार्तिक देशमुख आधार काढण्यासाठी रांगेत उभा राहिला. दरम्यान, पोलीस त्याच्या संपर्कात होते. त्यांच्याकडून या महा-सुविधा केंद्रात आधारकार्ड नोंदणी करण्यासाठी कुठलीही कागदपत्रे न देता २०० रुपये घेऊन अक्षय विजय ढमढेरे (रा. जुंबकरवस्ती, चाकण यांच्या नावाने आधार नोंदविले.दरम्यान, कार्तिक देशमुख याने हाताने इशारा करून पोलिसांना बोलाविले. बोगस नोंद केल्याचे आढळल्याने चौघांना ताब्यात घेण्यात आले. बनावट आधार कार्डची माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून इंंटरनेटवर आॅनलाईन खोटी नोंदणी खोटा दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी नायब तहसीलदार लता वाजे यांनी चाकण पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दिली आहे.सापळा रचून केली कारवाईमाहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून कोणतेही कागदपत्रे न घेता व वरील नावाने आधार नोंद केल्याचे लक्ष्यात आले. पोलिस व नायब तहसिलदार व पोलिस कर्मचाºयांनी सुविधा केद्रांमध्ये प्रवेश केला.या केंद्रात सागर दत्तात्रय लोखंडे (वय २२, रा. मरकळ ता.खेड), दर्शन मुकुंद कर्नावट (वय २३, रा. सोळू .ता खेड), मंगेश छगल येवले (वय २३, रा. शेल - पिंपळगाव ता खेड), नंदकुमार संतोष जमदाडे (वय २२, रा. मेदनकरवाडी ता खेड) यांना ताब्यात घेतले.पोलिसांनी ड्रावरमधून रोख रक्कम २० हजार रुपये, दोन लॅपटॉप, दोन प्रिंटर मशीन, दोन हताचे ठसे घेण्याचे मशीन, दोन डोळ्याचे फोटो काढण्याचे मशीन असा ६० हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :PuneपुणेArrestअटक