शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

अनुसूचित जाती वर्गातून माधुरी तिखे राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 21:09 IST

आयुष्यात चांगले काहीतरी करायचे या ध्येयानेच अभ्यास करत राहिले. आईची मेहनत आणि माझे कष्ट यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविता आले.

ठळक मुद्देतहसीलदारपदी निवड : प्रतिकूल परिस्थितीत मिळवले उज्ज्वल यशआयआयटी गुवाहाटी येथून बी. टेक इंजिनिअरिंग पूर्ण२०१५ साली राज्य लोकसेवा आयोगाची तयारी करण्यासाठी पुण्यात प्रज्ञावर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश

पुणे : चौथीत असताना वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती बिकट होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत आईने संघर्ष करत भावाबरोबर मला चांगले शिक्षण दिले. आयुष्यात चांगले काहीतरी करायचे या ध्येयानेच अभ्यास करत राहिले. आईची मेहनत आणि माझे कष्ट यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती वर्गातून मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळाला असल्याचे तहसीलदारपदी निवड झालेल्या माधुरी तिखे हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.माधुरी तिखे मूळची अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चांदगावची. आई नगरपरिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका होती. त्यामुळे तिचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण श्रीगोंदा येथे, तर सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये झाले. तर अकरावी आणि बारावीचे शिक्षण बॅँगलोर येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. या दोन वर्षांदरम्यान तिला दक्षिणा फौऊंडेशनची बी. टेकसाठी शैक्षणिक स्कॉलरशिप मिळाली. दोन वर्षे तिला बी. टेकचे मोफत मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे २०११ साली आयआयटी गुवाहाटी येथे पदवी शिक्षणासाठी तिची निवड झाली. आयआयटी गुवाहाटी येथून बी. टेक (इंजिनिअरिंग) पूर्ण केले. त्यानंतर २०१५ साली राज्य लोकसेवा आयोगाची तयारी करण्यासाठी पुण्यात प्रज्ञावर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश घेतला. मागील तीन वर्षांत स्पर्धा परीक्षेची कसून तयारी केल्याने पहिल्या प्रयत्नातच अनुसूचित जाती वर्गातून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळाला. .......................नोटस, गट चर्चा, सराव परीक्षेमुळे यशक्लासमध्ये शिकवत असताना नोटस काढणे, चार जणांचा ग्रुप तयार करून वेगवेगळ्या विषयांवर गट चर्चा  करणे, ठराविक कालावधीत टेस्ट सिरीजचा सराव केला. तसेच मागील काही वर्षातील आयोगाच्या परीक्षांचे पेपर सोडवत राहिले. त्यामुळे दरवर्षी विचारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांचा कल लक्षात आला. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यामुळे दुसऱ्या प्रयत्नात तहसीलदारपदी निवड झाल्याचे माधुरी तिखे हिने सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षा