शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माधुरी मिसाळ यांनी थांबविली अतिक्रमण कारवाई

By admin | Updated: June 1, 2015 05:37 IST

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने महात्मा फुले मंडईतील अनधिकृत पथारी व हातगाडीवर दोन दिवसांपूर्वी धडक कारवाई केली होती.

पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने महात्मा फुले मंडईतील अनधिकृत पथारी व हातगाडीवर दोन दिवसांपूर्वी धडक कारवाई केली होती. परंतु, राजकीय वरदहस्त असलेल्या पथारी व्यावसायिकांनी कारवाईला न जुमानता मंडईबाहेर अनधिकृतपणे व्यावसाय सुरू केला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रविवारी सकाळी पुन्हा कारवाई सुरू केली. मात्र, काही वेळातच आमदार माधुरी मिसाळ या कार्यकर्त्यांसह तिथे आल्या. अधिकाऱ्यांना बोल सुनावत कारवाई तातडीने थांबविण्यास भाग पाडले. तसेच, आयुक्तांना उद्या (सोमवारी) भेटून तक्रार करणार असल्याचे सुनावले. गेल्या आठवड्यात शहरातील प्रमुख रस्ते, चौक व भाजी मंडईतील अतिक्रमणांवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला होता. सर्वपक्षीय नगरसेवकांनी अतिक्रमणावर कारवाई करीत नसल्याचे आरोप करीत प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यामुळे चार दिवसांपासून अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध भागांत कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. महात्मा मंडईत दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने कारवाई करून अतिक्रमण काढले होते. त्यामुळे मंडई परिसर मोकळा श्वास घेईल, असे वाटत होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी महापालिकेच्या कारवाईला न जुमानता राजकीय वरदहस्त असल्याने बिनदिक्कतपणे मंडईबाहेर पथारी व अनधिकृत विक्री राजरोस सुरू झाली. दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमणे विभागाने रविवारी सकाळी मंडई परिसरात कारवाई सुरू केली. मंडईत अधिकृत गाळे रिकामे असताना अनधिकृतपणे रस्त्यावर अतिक्रमण करून विक्री करणाऱ्यांवर सकाळी नऊ वाजता कारवाई सुरू केली. त्यामुळे अनधिकृत विके्रते व पथारी चालकांची धावपळ व फोनाफोनी सुरू झाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये आमदार मिसाळ कार्यकर्त्यांसह तिथे आल्या. अनधिकृतऐवजी अधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले, असे त्यांनी सुनावले. आयुक्त कुणाल कुमार यांना फोन करून त्यांनी कारवाई तातडीने थांबविण्यास सांगितले. तसेच, उद्या भेटून त्याविषयी चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण पथकाला कारवाई न करता परत फिरावे लागले. त्याविषयी मिसाळ म्हणाल्या, ‘‘गेल्या आठ वर्षांपासून मंडई परिसराचे नूतनीकरणाचे काम रेंगाळले आहे. अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, महापालिकेचे प्रमाणपत्र असलेल्या अधिकृत विक्रेत्यांवर होणारी चुकीची कारवाई थांबविली आहे. आयुक्त कुणाल कुमार यांची याविषयावर उद्या भेट घेणार आहे. ’’(प्रतिनिधी)