शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

बारामती शहरातील उद्यानांमध्ये प्रेमी युगुलांचे चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 23:16 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : सुरक्षारक्षक झाडाखाली निवांत

बारामती : झारगडवाडी येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येनंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. महाविद्यालय, रस्ते अशा ठिकठिकाणी निर्भया पथक कारवाई करीत आहे. मात्र, शहरातील बागांमध्ये सुरू असणाऱ्या प्रेमी युगुलांच्या अश्लील चाळ्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

बारामतीमधील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाºया पूनावला उद्यानामध्ये भरदिवसा दिसणारे हे चित्र आहे. जोडप्यांचे अश्लील चाळे सुरू असताना नगरपालिकेचे सुरक्षारक्षक निवांत झाडाखाली बसलेले असतात व या जोडप्यांकडे काणाडोळा करतात. पोलिसांना याबाबत कळविणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भिगवण चौकातील गजबजलेल्या ठिकाणी पूनावाला उद्यान आहे. त्याचे प्रवेशद्वार अनेकदा दिवसभर उघडे असते. त्यामुळे बागेत लव्हबर्डचा हा अड्डा झाला आहे. बागेतील बाकड्यावर हे निवांत तासन् तास बसून असतात. या बाकड्यांवर बसूनच प्रेमी युगुलांचे चाळे सुरूअसतात. सुरक्षारक्षकदेखील त्यांना हटकत नाहीत; त्यामुळे या जोडप्यांचे चांगलेच फावते. ते कोणाची पर्वा न करता येथे बसतात. संध्याकाळी महिला लहान मुलांना खेळण्यासाठी बागेत घेऊन येतात. त्याचप्रमाणे वयस्कर लोक व महिला येथे चालण्याचा व्यायाम करायला येतात. या जोडप्यांच्या चाळ्यांमुळे येथे येणाºयांना मानसिक त्रास होतो. त्याचप्रमाणे टी. सी. कॉलेजकडे जाणाºया रस्त्यावरदेखील बाग बनवली आहे. तेथे बसण्यासाठी बाकडे टाकले आहे. येथेही चित्रवेगळे नाही.नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई : शिरगावकरदहीहंडी उत्सव मंडळांनी न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा. नियमांचे उल्लंघन करणाºया मंडळांवर कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिला.४शहर पोलीस ठाण्यात बारामतीतील दहीहंडी उत्सव मंडळांच्या पदाधिकाºयांच्या बैठकीत ते बोलत होते. शिरगावकर म्हणाले, की दहीहंडी उत्सवात किती थर लावावेत, यासंबंधी मर्यादा आहेत, त्याचे पालन मंडळांनी केले पाहिजे. दहीहंडीमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर होऊ देऊ नये. थर लावताना अल्पवयीन मुलांना स्थान दिले तर मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. साऊंड सिस्टीमचा वापर टाळावा. ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. उत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता मंडळांनी आपले स्वयंसेवकही नेमावेत.

पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ म्हणाले, की स्वयंशिस्तीने उत्सवाचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक मंडळाने, त्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वयंशिस्तीचे दर्शन उत्सवाच्या माध्यमातून घडवावे. पोलीस नाईक ओंकार सिताप यांनी यावेळी शहरात ३३ नोंदणीकृत मंडळे असल्याचे सांगून उत्सवासाठी मंडळांनी आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात, असे आवाहन केले. या वेळी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, निरीक्षक धुमाळ आदी उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती