गावामध्ये यंदा या अभियानांतर्गत ६८२ रोपे वृक्षसंवर्धनासाठी दिली. या 'रानमळा पॅटर्न'चे उद्घाटन पी. टी. शिंदे, सरपंच प्रमोद शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच रोहिणी दौंडकर, प्रतिष्ठान अध्यक्ष यादवशेठ शिंदे, जि. रं. शिंदे, गोरक्ष सुकाळे, दशरथ भुजबळ, ग्रामसेविका डोंगरे, समीर शिंदे, उल्हास भुजबळ, नवनाथ थोरात, जगदीश खडके, वनपाल मुके, घोलप आणि ग्रामस्थांनी नियमांचे पालन करून उपस्थिती लावली.
यावेळी गावच्या डोंगरावरील वणव्याला विझविणाऱ्या तरूणांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पातळीवर 'रानमळा पॅटर्न' म्हणून ओळख प्राप्त झालेल्या व पुरस्कार प्राप्त रानमळा गावाला वृक्षारोपण व संवर्धन करण्यासाठी सन २००३ पासून वृक्षप्रेमी दानशूर व्यक्तींनी आणि विविध संस्थांनी आर्थिक व फळझाडांची मदत केल्याने रानमळा गावात व डोंगर परिसर वृक्षांनी नटलेला दिसून येतो.
--
फोटो क्रमांक : ०८कडूस रानमळा पॅटर्न
सोबत फोटो : रानमळा (ता. खेड) येथे ६८२ रोपांची मान्यवरांच्या हस्ते लागवड कार्यक्रम उद्घाटनप्रसंगी पदाधिकारी.