शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
2
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
3
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
4
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
5
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
6
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
7
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
8
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
9
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
10
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
11
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
12
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
13
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
14
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
15
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
16
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
17
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
18
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
19
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
20
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर

आंबेगाव तालुक्यात भात शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण आहुपे खोऱ्यांमध्ये सोमवार (दि.१९) रोजी दुपारी पावसाने सूरुवात केली. मंगळवारी पावसाचा जोर ...

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण आहुपे खोऱ्यांमध्ये सोमवार (दि.१९) रोजी दुपारी पावसाने सूरुवात केली. मंगळवारी पावसाचा जोर काहीसा वाढला. परंतु बुधवार व गुरुवारी मुसळधार पावसाने अक्षश: थैमान घातले. डिंभे धरण परिसरामध्ये गेल्या चोविस तासामध्ये १२९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर डिंभे धरणामध्ये पाण्याचा साठा गुरूवारी सकाळपर्यंत ४३.७२ टक्के एवढा झाला आहे. आतापर्यंत ४६७ मी.मी. पाऊस पडला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे ही खोरी व हा परिसर भातशेतीची आगार समजली जातात. भात खाचरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे भात पेरणी करणे मोठे जिकरीचे झाले होते. परंतु नाइलाजवास्तव आदिवासी बांधव हा पाण्यातच भात पेरणी केली. या नंतर धुळवाफ व चिडवाफ झाल्यामुळे माती आड गेलेला दाणा उतला. परंतु माती वर राहीलेला दाणा न उतरल्यामुळे भात रोपे विरळ झाली. या नंतर पावसाने पंधरा ते वीस दिवस दडी मारल्यामुळे उतरुन आलेली भात रोपे पिवळी पडु लागली. काही रोपे लागवडी योग्य असतानाही चिखल करण्यासाठी पाणी नसल्यामुळे लागवडी रखडल्या. आदिवासी बांधवांनी विहीरी तलावातुन मोटारीद्धारे पाणी घेवुन भात लागवडी केल्या परंतु सोमवार पासुन पावसाने हलकी अशी सूरुवात केली परंतु बुधवारी (दि.२१) व गुरुवारी पावसाने अक्षश: थैमान घातले.यामुळे अनेक ठिकाणी भात खाचरांचे बांध फुटुन भात खाचरे गाडली गेली असुन भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे.बांधनींच्या भात खाचरांचे बांधांचे मोठे नुसकान झाले आहे.काही शेतकऱ्यांचे भात रोपांचे मुठ वाहुन गेले आहेत. बारा महिने मोठ्या आशेने काबाड कष्ट करुन ऐन वेळी होणाऱ्या निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे भात उत्पादनवाढीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. या भागातील निगडाळे कोंढवळ, तेरुंगण, राजपुर, तळेघर, चिखली, राजेवाडी, गोहे, डिंभा, पोखरी, जांभोरी, फलोदे, पाटण, म्हाळूंगे, साकेरी, पिंपरी, सावरली, आहुपे, बेंढारवाडी, डोण, तिरपाड, आघाणे, पिंपरगणे, असाणे, बोरघर, मेघोली, दिगद, अडीवरे, माळीण, बोरघर, फुलवडे, कोंढरे, आमडे, आसाणे भोईरवाडी न्हावेड,या गावामध्ये भात खाचर व भात रोपांची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.

जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर,सदस्या इंदुताई लोहकरे तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, सहाय्यक पोलिस निरिक्षक लहु थाटे, कार्यध्यक्ष प्रदीप आमोंडकर निलेश बोर्‍हाडे अंकीत जाधव यांनी आदिवासी भागाचा दौरा करुन नुसकान ग्रस्त भागाची पहाणी केली.

फोटो :-आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण आहुपे खोर्‍यांमध्ये अवकाळी मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी भात खाचरांचे बांध फुटुन भात रोपे गाडली गेल्यामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे.