शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भिगवण बाजारपेठेतील पर्स आणि बॅग दुकानाचे आगीत नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:37 IST

भिगवण बाजारपेठेशेजारी असणाया गणेश मार्केट परिसरात ही घटना घडली. कुसुम लेदर या लेडीज पर्स पाकिटे आणि प्रवासी तसेच शाळेच्या बॅग असणाºया दुकानला पहाटेच्या सुमारास ही आग लागली.

भिगवण : भिगवण बाजारपेठेतील मध्यवस्तीत असणाऱ्या पर्स आणि बॅग दुकानाला पहाटे लागलेल्या आगीत दुकानदाराचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी फोन केल्यानंतर बारामती अ‍ॅग्रो साखर कारखान्याची फायर ब्रिगेडची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत दुकानातील संपूर्ण साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

भिगवण बाजारपेठेशेजारी असणाया गणेश मार्केट परिसरात ही घटना घडली. कुसुम लेदर या लेडीज पर्स पाकिटे आणि प्रवासी तसेच शाळेच्या बॅग असणाºया दुकानला पहाटेच्या सुमारास ही आग लागली. पोलीस पेट्रोलिंग तसेच गुरख्याच्या लक्षात पहिल्यांदा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी फोन करीत इतरांना याची माहिती दिली. तसेच या दुकानाचे मालक रोकडे यांना याची माहिती दिली.रोकडे यांनी दुकानाचे शटर उघडेपर्यंत आगीने रौद्र रूप घेतले होते. तसेच याठिकाणी पिशव्या चिटकवण्यासाठी लागणारे लिक्विड असल्यामुळे त्याने लवकर पेट घेतला त्यामुळे कोणालाही आग विझविण्याची संधी मिळाली नाही. या आगीत दुकानदाराचे १० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच यासाठी लागणारी संपूर्ण यंत्रणा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या वेळी अनेक तरुणांनी बिल्ट कंपनीला आग विझविण्यासाठी अग्निशमनच्या गाडीसाठी फोन केला, मात्र कंपनीकडून गाडी नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश ढवान यांनी बारामती अ‍ॅग्रो कारखान्याचे व्हाईस चेअरमन आबा गुळवे यांना फोन करून गाडी पाठविण्यास सांगितले. त्यानंतर अर्ध्या तासात ही गाडी आल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले.गाडी काही वेळ आली नसती तर या दुकानाशेजारी असणाºया प्लायवूडच्या गोडावूनालाही आगीने वेढले असते. मात्र गाडी वेळेवर आल्याने पुढील प्रसंग टळला.४भिगवणपासून पाच किलोमीटर अंतरावर असणारी बिल्ट कंपनी भिगवण परिसरात आग लागल्यावर कोणतेही सहकार्य करताना दिसून येत नाही. तर मग प्रत्येक वेळी गाडी नादुरुस्त सांगणारी कंपनी आपल्या परिसरात काही दुर्घटना घडल्यास काय उपाययोजना करते असा सवाल भिगवणकर विचारीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे