शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

घरोघरी विराजमान गणपतीबाप्पा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 19:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बाप्पा घरात येणार असल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच सजावट करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी सकाळपासून नवे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बाप्पा घरात येणार असल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच सजावट करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी सकाळपासून नवे कपडे घालून बाप्पांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. घरामध्ये गृहिणींनी गोड-धाेडाचा नैवेद्य बनविला होता. लहान-थोरापासून सर्वांनी बाप्पांचे स्वागत करून आनंद साजरा केला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा गजर करत घराघरात ऐकायला मिळाला.

दरवर्षीप्रमाणे यंदा लाडक्या गणरायाचे स्वागतासाठी शनिवारी सकाळपासून घरोघरी जय्यत तयारी सुरू केली होती. गेल्या चार-पाच दिवसांमध्ये काम सांभाळून खरेदी, सजावटीसह बाप्पांच्या नैवेद्यात वैविधता आणण्यासाठी गृहिणींनी कंबर कसली होती. घरातील साफसफाईनंतर शुक्रवारी (दि.६) रात्रीपासून त्यांचा मोर्चा सजावटीकडे वळला होता. घरातील पुरुष मंडळींसोबत चिमुकल्यांनी देखील सजावटीचा भार उचलला होता. तर सुगरणींनी बाप्पांच्या नैवेद्याचा भार आपल्या खांद्यावर घेतला. उकडीच्या मोदकांबरोबरच विविध गोडधोडीचा नैवेद्य तयार केला होता.घरामध्ये छानशा ठिकाणी भाविकांनी बाप्पांसाठी सजावटी केल्या. घराघरात फुलांच्या माळा, विजेच्या माळा आणि आकर्षक मखर करण्यात आली आहेत. काहींच्या घरात दीड दिवस, पाच तर काहींच्याकडे दहा दिवसांचे गणराय असणार आहेत.

थर्माकोलचा वापर कमी !

गेल्या काही वर्षांपासून बाप्पांच्या सजावटीसाठी थर्माकोलचा वापर अधिक होत असे. पण त्यावर बंदी असल्याने आता त्याचा वापर हळूहळू कमी होत आहे. यंदा तर बऱ्यापैकी अनेकांनी पर्यावरणपूरक गणपतीचा उपक्रम राबविला.

घरामध्ये बाप्पांचे आगमन होणार म्हटलं की, आनंदीआनंद होतो. बाप्पा हे घरातील एक सदस्यच असतात. दहा दिवस खूप आनंदाचे, चैतन्याचे आणि उत्साहाचे जातात. विघ्नहर्ता बाप्पा आल्याने घरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.-शीतल चव्हाण, गृहिणी 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024