पुणे : मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणाला चाकुचा धाक दाखवत चार जणांच्या टोळक्याने दोन हजारांची रोकड आणि दोन मोबाईल लंपास केले. ही घटना हनुमान टेकडीवर मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. गेल्या पाच दिवसातील ही दुसरी घटना आहे. याप्रकरणी किरण मासोळे (वय १८, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. मासोळे आणि त्यांचा मित्र महेश सांगळे हनुमान टेकडीवर फिरायला गेले होते. तेथे आलेल्या चारजणांच्या टोळक्याने त्यांना चाकुचा धाक दाखवला. दोघांचे मिळून २ हजार १०० रुपये दोन मोबाईल असा मिळून १६ हजार १०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. अशाच प्रकारची दुसरी घटना शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली होती. मैत्रिणीसह फिरायला गेलेल्या देवेश कोळेकर (वय २२, रा. गोखलेनगर) याला चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून २० हजारांचा ऐवज लूटला.
हनुमान टेकडीवर पुन्हा लुटमारीच्या घटना
By admin | Updated: December 4, 2015 02:45 IST