लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : चुलतभावाने दुचाकीची पुंगळी काढुन चालवली तसेच पूर्वीच्या वादावरून युवकावर कोयत्याने तिघांनी हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना लोणीकाळभोर येथे रविवारी घडली.
हर्षल पांडुरंग चौधरी (वय २१, रा. समर्थ सृष्टी, हनुमान मंदिराजवळ, कवडी माळवाडी, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अे या हल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादी वरून राज राजेद्र पवार, संकेत सुनिल गायकवाड व सोमनाथ उर्फ डच्या लोंढे (सर्व रा. कवडी माळवाडी, कदमवाकवस्ती, ता. हवेली) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास राज पवार याने मोबाईल वरून हर्षल यांस शिवीगाळी करून चुलत भाऊ कुणाल चौधरी हा दुचाकीची पुंगळी काढत मोठ्याने आवाज काढीत आमच्या परिसरातून पळवीत आहे. त्याला समजावून सांग नाहीतर तुमच्या दोघांकडे पाहून घेईन अशी धमकी दिली. त्यावेळी दोघांमध्ये फोनवर बाचाबाची झाली. रात्री ११.३० च्या सुमारास हर्षल मित्र ओकांर सोबत घरी येत असताना गुजर वस्तीमधील गणपती मंदिराच्या बाजूला मार्गावर राज पवार हा पाठीमागून दुचाकी वरून आला. त्याला शिवीगाळ करत हर्षलवर कोयत्याने वार केले. याच वेली पाठीमागुन येत संकेत गायकवाड व सोमनाथ लोंढे या दोघांनी लोखंडी पाईपने हर्षला मारहाण केली. गंभीर जखमी झाल्याने हर्षल तेथेच चक्कर येवुन पडला. त्यावेळी ओंकार याने विपुल चौधरीला याची माहिती देऊन हर्षलला रूग्णालयात भरती केले.