शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोरला साडेतीन लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:36 IST

अवैध दारू नेणा-या संशयित टेम्पोचा बीट मार्शलनी (रात्रगस्त) सिनेस्टाइल पाठलाग केला. शेवटी चालकांनी टेम्पो सोडून पळ काढला.

लोणी काळभोर : येथे अवैध दारू नेणा-या संशयित टेम्पोचा बीट मार्शलनी (रात्रगस्त) सिनेस्टाइल पाठलाग केला. शेवटी चालकांनी टेम्पो सोडून पळ काढला. या टेम्पोची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात ३५ लिटरच्या ३८ प्लॅस्टिक कॅनमध्ये १ हजार ३३० लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळाली. पोलिसांनी टेम्पोसह दारू, असा एकूण ३ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिट मार्शल पोलीस नाईक संदीप देवकर व संतोष शिंदे हे दोघे पुणे-सोलापूर महामार्गावर कवडी पाट टोलनाका ते उरुळी कांचन परिसरात रात्री गस्त घालत होते. या वेळी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील प्रयागधाम फाटा येथे पहाटे ३-३० वाजण्याच्या सुमारास एक संशयित टेम्पो पुण्याकडे जाताना त्यांना दिसला. यातून मादक द्रव्यांचा वास येत असल्याने त्यांनी टेम्पोचालकाा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने टेम्पो न थांबवता भरधाव वेगात नेला. देवकर व शिंदे यांनी दुचाकीवरून पाठलाग सुरू केला. संशयित टेम्पो कवडीपाट टोलनाका येथे थांबेल याचा अंदाज आल्याने तेथील कर्मचा-यांना वाहन क्रमांक कळवून टेम्पो थांबवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यानुसार टोलनाक्यावरील कर्मचा-यांनी बॅरिकेड लावले. दरम्यान मार्शल दुचाकी व टेम्पोमध्ये चार ते पाच फुटांचे अंतर राहिले असताना चालकाने विरुद्ध बाजूने गाडी घालून दुचाकीस भरधाव वेगात कट मारून बॅरिकेड तोडून पुणे बाजूकडे निघाला. टेम्पो पुणे शहर हद्दीत गेला तरीसुद्धा बिट मार्शलनी वाहनाचा पाठलाग सुरू ठेवून ग्रामीण कंट्रोल यांच्याशी संपर्क साधून पुणे शहर पोलीस दलाकडून मदत मिळणेबाबत कळवले. चालकाने टेम्पो हडपसरवरून मोहम्मदवाडीकडे वळवला. तरडेवस्ती येथे टेम्पो उभा करून चालक पळून गेला. त्यानंतर देवकर व शिंदे यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. टेम्पोची तपासणी केली असता त्यात प्लॅस्टिकच्या ३८ कॅनमध्ये १ हजार ३३० लिटर गावठी हातभट्टी सापडली.