शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

LOKMAT IMPACT : पुणे महापालिकेकडून पुन्हा शहरातील ३५ खाजगी रूग्णालयनिहाय ऑडिटरची नियुक्ती    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 21:03 IST

आत्तापर्यंत खाजगी रूग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा आकारण्यात सव्वा कोटीहून अधिक रक्कम ऑडिटरमार्फत कमी

ठळक मुद्देसहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा नाईक यांच्या नियंत्रणाखाली सदर ऑडिटर काम करणार

पुणे : खाजगी रूग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांची तपासणी करण्यासाठी (प्री ऑडिट) आरोग्य विभागाकडून मागणी करण्यात आल्याप्रमाणे, पुन्हा शहरातील ३५ खाजगी रूग्णालयनिहाय ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली आहे.    सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा नाईक यांच्या नियंत्रणाखाली सदर ऑडिटर काम करणार आहेत. याबाबत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी गुरूवारी आदेश काढले आहेत.         कोरोनाबाधितांवर उपचार करताना काही खाजगी रूग्णालयांकडून अव्वाच्यासव्वा बिले आकारली जात आहेत. दीड लाखापेक्षा अधिक बिल आकारणी केल्यास व संबंधित रूग्णाने अथवा रूग्णाच्या नातेवाईकांनी महापालिकेकडे बिलाबाबत तक्रार केल्यास त्याची पालिकेच्या ऑडिटर कडून तपासणी करण्यात येत होती. आत्तापर्यंत सव्वा कोटीहून अधिक रक्कम या ऑडिटरमार्फत कमी करून, जादा बिल आकारणी करण्यात आलेल्या रूग्णांना न्याय देण्यात आला होता. 

    मात्र शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी झाल्याने, महापालिकेकडून २५ लेखापालांसह ४० कनिष्ठ अभियंता यांची नियुक्ती पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी करण्यात आली होती. दरम्यान, आरोग्य विभागाकडे ऑडिटसाठी येणाऱ्या बिलांची संख्या लक्षात घेता, शहरातील ३५ खाजगी रूग्णालयनिहाय पुन्हा ऑडिटरची नियुक्ती केली आहे़ या निर्णयामुळे आता रूग्णांच्या नातेवाईकांना महापालिकेचे खेटे मारावे लागणार नसून, रूग्णालयनिहाय ऑडिटरमुळे अव्वाच्या सव्वा बिल आकारणी करणाऱ्या खाजगी रूग्णालयांवरही अंकुश कायम राहणार आहे.     

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल