पुणे : सोन्याचांदीच्या दागिन्यांना पॉलीश करण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी 30 हजारांचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इंदिरा भिमराव गायकवाड (वय ६७, रा. बुद्ध विहाराच्या मागे, दिघीगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गायकवाड या बुधवारी सकाळी घरी असताना अकराच्या सुमारास दोन व्यक्ती आले. त्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांना आणि भांड्यांना पॉलीश करण्याच्या बहाण्याने घरामध्ये प्रवेश केला. सोन्याच्या राणीहार आणि अंगठी असा 30 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.
पॉलिशच्या बहाण्याने दागिने लंपास
By admin | Updated: May 8, 2014 22:25 IST