शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या ‘दीपोत्सव' दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 08:34 IST

देशभरातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांची माहिती पुणेकरांना व्हावी, यासाठी या अंकांचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे.

पुणे : स्व. कमलाबाई रसिकलाल धारिवाल पुरस्कृत छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा पुरस्कारात यंदा लोकमतच्या ‘दीपोत्सव' दिवाळी अंकाला उत्कृष्ट मुखपृष्ठासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिनमार्क पब्लिकेशनचे दिनकर शिलेदार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी लेखक डॉ. माधव राजगुरू उपस्थित होते.

मंगळवारी (दि.१) सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात माजी संमेलनाध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते, धारिवाल इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाशशेठ धारिवाल यांच्या उपस्थितीत दिवाळी, ख्रिसमस आणि रमजान अंकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

सायंकाळी पाच वाजता गणेश सभागृहात अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, ज्येष्ठ लेखिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो, संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.

‘ही स्पर्धा दिवाळी अंकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात येते. यंदा ख्रिसमसच्या निमित्ताने वसई येथून प्रकाशित होत असलेल्या अंकांच्या प्रवेशिका, तसेच रमजान सणानिमित्त प्रकाशित होणारा 'नब्ज्' हा अंक स्पर्धेसाठी स्वीकारण्यात आला. 

देशभरातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांची माहिती पुणेकरांना व्हावी, यासाठी या अंकांचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यंदा स्पर्धेमध्ये २३४ प्रवेशिका स्वीकारण्यात आल्या आहेत. अमेरिकेतून दोन दिवाळी अंक स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

'दीपोत्सव'चा सन्मान 

यंदाच्या उत्कृष्ट मुखपृष्ठाचा मान लोकमत समूहाच्या 'दीपोत्सव' दिवाळी अंकाला मिळाला आहे. हे मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. 

‘खुर्ची- सत्तेपासून सेक्सपर्यंत हा विषय असलेल्या 'दीपोत्सव'च्या संपादक अपर्णा वेलणकर असून, यामध्ये सामाजिक राजकीय आणि कौटुंबिक अशा व्यापक संदर्भात 'खुर्ची'चे महत्त्व अधोरेखित केले आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Puneपुणे