शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

लोहगाव ग्रामपंचायत : २७ लाख ९० हजारांची अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:29 IST

लोहगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचासह ग्रामसेवक आणि सदस्यांवर शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत.

पुणे : लोहगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचासह ग्रामसेवक आणि सदस्यांवर शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत.ग्रापंचायतीच्या आर्थिक व्यवहारामध्ये २७ लाख ९० हजारांची अफरातफर करण्यात आली आहे. यासाठी तत्कालीन सरपंच सोनाली भुकण, दीपक मोझे, प्रितम खांदवे, संतोष खांदवे, सोमनाथ खांदवे, संतोष कुंभार, रावसाहेब राखपसरे, सोनम काळभोर, श्वेता काळे, सुजाता ओव्हाळ, ग्रामसेवक एस. व्ही. लांडगे यांना जबाबदार धरण्यात आले आहे.बाजारकर हे ग्रामपंचायतीचे स्व:उत्पन्नाचे साधन आहे. तसेच दरवर्षी बाजार लिलाव होणे बंधनकारक आहे. संबधित ठेकेदारास रितसर पत्र देऊन बाजारकर वसुलीचा ठेको देणे तसेच त्यासाठी अटी-शर्तीचा करारनामा प्रक्रिया केल्या नाहीत. ग्रामपंचायत लोहगाव यांच्यावतीने बेकायदेशीर ठराव करून बाजारकर वसुली डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१५ अखेरपर्यंत संत तुकाराम महाराज ट्रस्टकडे जाणीवपूर्वक दिली. ट्रस्टने वसुल केलेली रक्कम ग्रामनिधीमध्ये जमा करणे अपेक्षित असताना अशी प्रक्रिया न करता त्यामध्ये अपहार झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तत्कालीन सरंपच, ग्रामसेवक आणि काही सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत.लोहगाव ग्रामपंचायत हद्दतील बाजार कर वसुलीसाठी संत तुकाराम महाराज अजोळ ट्रस्टला वसुलीचे अधिकार बेकायदेशिरत्या दिले होते. बाजार कराची रक्कम ग्रामपंचायतीस न मिळता ट्रस्टकडे जमा होत होती. ग्रामपंचयात ठराव क्रमांक ९३/६ दोन फेबु्रवारी २०१३ मध्ये बाजार कर वसुलीचे अधिकार जगदगुरू श्री संत तुकाराम मंदीर अजोळ ट्रस्ट यांना द्यावे असा ठराव सवार्नुमते करण्यात आला होता. सन २०१२-१३ आर्थिक वर्षासाठी बाजरकराचा ठेका देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. तसेच त्याचा रितसर करारनामा करण्यात आला नव्हता. तर ग्रामपंचायतीचा ठेका रद्द केलेला आणि ट्रस्टकडे बाजारकर देण्यासंदर्भात ठेकेदाराला लेखी कळविण्यात आले नाही.सन २०१२-१३ मधील बाजारकर ग्रामपंचायत भरणा करावयाचे ९ लाख रकमेचा ठेका ठेकेदार गुलाब धोेंडिबा मोडक यांना देण्यात आला होता. त्यापैकी त्यांनी ५ लाख रुपयांचा भरणा त्यांनी ग्रामपंचायतीला धनादेशाद्वारे केला आहे. तर उर्वरित बाजार कर वसुली मोडक यांनी दिलेल्या जबाबावरुन ट्रस्टचे चेअरमन प्रताप खांदवे यांच्या सांगण्यावरून ४ लाख ट्रस्टकडे जमा करण्यात आले. ठेकेदार मोडक यांनी सन २०१३-१४ मध्ये बाजारकर वसुलीचे ११ लाख सन २०१४-१५ मधील १३ लाखांचा करार करण्यात आला होता. त्यापैकी २३ लाख ९० हजार ट्रस्टकडे जमा करण्यात आले. तर मोडक यांनी २०१२-१३ मध्ये ट्रस्टला ४ लाख रुपये जमा केले होते. असे मिळून २७ लाख ९० हजार रुपये ट्रस्टकडे जमा केले होते.पैसे ट्रस्टकडे जमा केल्याची कोणतीही नोंद नाहीगैरव्यवहारामध्ये ग्रामविकास अधिकारी लोेहगाव यांनी बाजार कर गोळा करण्यासाठी ठेकेदार मोडक यांना दिलेल्या आदेशाची प्रत दफ्तरी आढळून आली नाही. तसेच बाजारकरासाठी देण्यात आलेली २७ लाख ९० हजारांची रक्कम ट्रस्टकडे जमा केल्याची कोणतीही नोंद आढळून आली नाही. सध्या ही रक्कम कोणाकडे आहे याची खातरजमा करता येत नसल्याचे जिल्हा प्रशानाने गटविकास अधिकाºयांना पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद केले आहे.