शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
4
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
5
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
6
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
7
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
8
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
9
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
10
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
11
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
12
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
13
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
14
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
15
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
16
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

स्थानिक नेत्यांना शिकवणीची गरज

By admin | Updated: October 4, 2016 01:43 IST

राज्यातील जिल्हा परिषदा (झेडपी) आणि पंचायत समित्यांमध्ये सदस्य म्हणून निवडून येणाऱ्या स्थानिक नेत्यांना संबंधित कामाचा कसलाच

पुणे : राज्यातील जिल्हा परिषदा (झेडपी) आणि पंचायत समित्यांमध्ये सदस्य म्हणून निवडून येणाऱ्या स्थानिक नेत्यांना संबंधित कामाचा कसलाच अनुभव नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे शासनाने या सदस्यांना संबंधित कामाचे प्रशिक्षण घेणे, बंधनकारक करण्याची गरज असल्याची बाब सर्वेक्षणात स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. तसेच आरक्षणामध्ये किमान दहा वर्षे बदल न करण्याबाबतही सुचविण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकारातून गोखले इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटिक्स अ‍ॅन्ड इकॉनॉमिक्स या संस्थेने राज्यातील सहा जिल्हे आणि १२ तालुक्यांमध्ये हे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये १६१ निवडून आलेले सदस्य, तसेच पराभूत उमेदवार आणि ६० अधिकारी, राजकीय विश्लेषक, स्थानिक नेत्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. पुण्यासह रायगड, औरंगाबाद, नंदुरबार, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण आयोगालाही सादर करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संचालक राजस परचुरे आणि मानसी फडके यांनी दिली. सर्वेक्षणातून समोर आलेल्या बाबींच्या आधारे काही महत्त्वपूर्ण सूचनाही आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणात केवळ २० टक्के उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असल्याची नोंद झाली आहे. मुलाखत घेण्यात आलेल्या ८० टक्के उमेदवारांना ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती, सामाजिक संस्था, दूध संघ, इतर सहकारी संस्थांमध्ये काम केलेले नाही. निवडून आलेल्या सदस्यांपैकी अनेकांना संबंधित कायदे, अंदाजपत्रक, योजना, निविदाप्रक्रिया याची माहिती नसते. त्यासाठी पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांपैकी केवळ ४४ टक्के जण संबंधित कामाचे प्रशिक्षण घेतात. विशेष म्हणजे प्रशिक्षण घेण्यासाठी महिला जास्त आग्रही असल्याचे दिसून आले आहे. जवळपास ५० टक्के सदस्य प्रशिक्षण घेण्यासाठी अनुत्सुक असतात. त्यामुळे राज्य शासनाने सर्व सदस्यांना प्रशिक्षण बंधनकारक करावे, असे आयोगाला सुचविण्यात आले आहे. आरक्षणाच्या चक्राकार (रोटेशन) पद्धतीमुळे लोकप्रतिनिधींना काम करण्याची पुरेपूर संधी मिळत नाही. निवडून आलेल्या महिला सदस्यांपैकी ७३ टक्के महिलांनी पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, सध्या आरक्षणातील बदलामुळे ही संधी मिळत नाही. त्यामुळे ही पद्धत बदलून किमान दहा वर्षे आरक्षण स्थिर ठेवावे किंवा लॉटरी पद्धत सुरू करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)