शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खोटी कागदपत्रे सादर करून कर्जाची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:45 IST

ट्रक खरेदी करण्यासाठी बँक ऑफ इंडिया शाखा, नारायणगाव यांच्याकडे खोटी कागदपत्रे सादर करून १४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

नारायणगाव : ट्रक खरेदी करण्यासाठी बँक ऑफ इंडिया शाखा, नारायणगाव यांच्याकडे खोटी कागदपत्रे सादर करून १४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या सुधीर बाळकृष्ण मुरादे (रा़ रोहकडी, ओतूर, ता. जुन्नर) व ट्रकचे कोटेशन देणारे श्री बालाजी एंटरप्रायजेस साई कॉम्प्लेक्स ओतूरचे प्रोप्रायटर आशिष दत्तात्रय गटकळ यांच्या विरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेतील वरिष्ठ व्यवस्थापक श्रीपाद नाझरकर यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक नाझरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सुधीर मुरादे यांनी बँक आॅफ इंडिया शाखा, नारायणगाव येथे दि़ २१/१०/२०१५ रोजी ट्रकखरेदीसाठी कर्ज प्रकरण केले होते़ त्यासाठी लागणाºया सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्याने बँकेने त्यांना १४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले होते़ कर्ज प्रकरणासाठी श्री बालाजी एंटरप्रायजेस साई कॉम्प्लेक्स ओतूरचे प्रोप्रा़ आशिष दत्तात्रय गटकळ यांनी कोटेशन दिले होते़ त्यानुसार मंजूर रक्कम श्री बालाजी एंटरप्रायजेस यांना आऱ.टी.जी़ एस़ द्वारे हस्तांतरित करण्यात आली होती.बालाजी एंटरप्रायजेसकडून टॅक्स इनव्हाइस पावती बँकेकडे जमा केली; मात्र बँकेला त्यांनी ट्रक दाखविला नाही़ तसेच आऱ सी़ बुकची वारंवार मागणी केल्यानंतरही आऱ सी़ बुक आलेले नसल्याचे कारण सांगून ते बँकेकडे जमा केले नाही. कर्जदार सुधीर मुरादे यांनी जुलै २०१८ पर्यंत घेतलेल्या कर्ज रकमेपोटी ११ लाख ४५ हजार रुपयांचे नियमित हप्ते भरले. उर्वरित रकमेपैकी ७ लाख १५ हजार २३३ रुपये व जुलै २०१८ पासूनचे बँकेचे व्याज न भरल्याने बँकेने आर.जे़ एंटरप्रायजेस या वसुली एजन्सीला ट्रक जप्त करण्यास सांगितले; मात्र मुरादे यांच्याकडे कोणताही ट्रक नसल्याचे वसुली एजन्सीस आढळून आले.बँकेकडे सादर केलेले इंजिन व चासीज नंबर, आर टी़ पासिंग नंबर तसेच नाव, पत्ता मिळणेकामी प्रादेशिक परिवहन विभाग पिंपरी-चिंचवड यांच्याकडे चौकशी केली असता, सदरचा इंजिन व चासीज नंबर व ट्रक विक्रम सुभाष घुले यांच्या नावावर असल्याचे आढळून आले़ अखेर फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत़ संबंधित घटनेबाबत नारायणगाव परिसरात चर्चा होत आहे.कर्ज घेऊनही ट्रकची खरेदीच नाहीट्रकखरेदीसाठी कर्ज प्रकरण केले होते़ कागदपत्रांची पूर्तता केल्याने बँकेने १४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले होते़ श्री बालाजी एंटरप्रायजेस ने कोटेशन दिले होते़ त्यानुसार बालाजी एंटरप्रायजेसकडून टॅक्स इनव्हाइस पावती बँकेकडे जमा केली; मात्र बँकेला ट्रक दाखविला नाही़ तसेच आऱ सी़ बुक आलेले नसल्याचे कारण सांगून तेही बँकेकडे जमा केले नाही. कर्जदार मुरादे यांनी जुलै २०१८ पर्यंत कर्ज रकमेपोटी ११ लाख ४५ हजार रुपयांचे नियमित हप्ते भरले़ जुलै २०१८ पासूनचे बँकेचे व्याज न भरल्याने बँकेने आर.जे़ एंटरप्रायजेस या वसुली एजन्सीला ट्रक जप्त करण्यास सांगितले; मात्र मुरादे यांच्याकडे कोणताही ट्रक नसल्याचे वसुली एजन्सीस आढळून आले़

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँक