शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत व्यक्तीला जाळून लाटली जमीन

By admin | Updated: January 6, 2016 00:34 IST

मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारे ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक जिवंत असताना ते मृत झाले असल्याचे भासवत स्मशानभूमीत त्यांच्या नावाचा जाळण्याचा खोटा दाखला तयार केला

लोणावळा : मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारे ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक जिवंत असताना ते मृत झाले असल्याचे भासवत स्मशानभूमीत त्यांच्या नावाचा जाळण्याचा खोटा दाखला तयार केला. त्या आधारे सदर व्यक्तीचे बनावट मृत्युपत्र व दाखला तयार करून त्या आधारे लोणावळ्यातील पांगोळोलीजवळील कोट्यवधी रुपयांची जमीन लाटण्याचा प्रकार करणाऱ्यांचा गेम उघड झाला असून, लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवीत दोन जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आय़ एस़ पाटील यांनी दिली़माणेकराज उदयराज गोलीया (वय ७३, रा़ प्रेसिडेन्ट सोसायटी, विलेपार्ले, प़ मुंबई) यांनी याप्रकरणी ५ नोव्हेंबर २०१५ रोजी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याबाबतची फि र्याद दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे़ माणेकराज गोलीया यांच्या बंगल्याचे केअर असल्याचे भासविणारे अजय भीमराव पाटील (वय ३७, रा़ हडपसर, पुुणे), ज्ञानेश्वर भगवान गायकवाड (वय ४०, रा़ मार्केटयार्ड, पुणे), शिवप्रताप हरिविजय भोसले (वय ३१, रा़ दत्तवाडी, पुणे), ज्ञानेश्वर कोंडिबा अलकापुरे (वय ४०, रा़ हडपसर, पुणे) या चौघांनी हा सर्व प्रकार केला आहे़ यापैकी भोसले याला १९ नोव्हेंबरला, तर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठीचा दाखला घेण्यासाठी पॅनकार्ड देऊन सहकार्य करणारा अजय सुरेश जैन (वय ४२, रा़ नाना पेठ, पुणे) याला ३ डिसेंबरला लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे़ हे दोन्ही आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. (वार्ताहर)