शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

‘पेंटेंड स्टॉर्क’ला जीवदान

By admin | Updated: January 13, 2015 05:44 IST

अन्नाविना अत्यवस्थ झालेल्या करकोचा प्रजातीच्या पक्ष्याला मुळशी तालुक्याच्या माणजवळ घोटावडे येथे सोमवारी जीवदान मिळाले

पिंपरी : अन्नाविना अत्यवस्थ झालेल्या करकोचा प्रजातीच्या पक्ष्याला मुळशी तालुक्याच्या माणजवळ घोटावडे येथे सोमवारी जीवदान मिळाले. सामाजीक कार्यकर्ते रामचंद्र देवकर यांच्या प्रयत्नातून या पक्ष्याचा बचाव करण्यात आला असून, त्याला वनविभागाकडे सुपूर्त करण्यात आले. आजवर अनेक वन्यजीवांना जीवदान देण्यास प्रयत्न करणाऱ्या देवकर यांचे पंचक्रोषीत कौतूक होत आहे. माणच्या आयटी पार्कच्या तिसऱ्या टप्याजवळच घोटावडे गावच्या देवकरवाडी येथे रविवारी सायंकाळी एक वेगळाच पक्षी डबक्याच्या काठावर बसल्याचे रामचंद्र देवकर यांनी पाहिले. तो कित्तेक तासांपासून एकाच जागेवर थांबून इतर पक्षांप्रमाणे हालचाल करीत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तरीही तो पक्षी तेथून उडत नव्हता. त्यामध्ये ताकतच उरली नसल्याचे पारखून देवकर यांनी सोनाली मातेरे, विजय मातेरे, रघुनाथ म्हस्के, शिवकन्या देवकर यांच्या मदतीने या पक्ष्याला पकडले. घराजवळ असलेल्या शेडमधील पक्ष्याच्या जाळीमध्ये सुरक्षित ठेवले. याची माहिती पौड वनपरिक्षेत्र अधिकारी सुधाकर खलाटे यांना दिली. त्यानंतर घोटावडे विभागाचे अधिकारी गावडे व त्यांचे सहकारी देवकरवाडीत दाखल झाले. त्यांनी पक्षी ताब्यात घेवून कात्रज उद्यानातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे उपचारासाठी दाखल केला आहे. पौड वनपरिक्षेत्राचे अधिकारी खलाटे म्हणाले,‘‘देवकर वाडीत सापडलेला हा पक्षी करकोचा कुळातील ‘ग्रे हेरॉन’ प्रजातीचा असल्याचे प्रथम दर्शनी आढळते. मात्र त्याच्या डोके व चोचीचा भाग इतर करकोचांपेक्षा मोठा आहे. हा पुर्ण वाढ झालेला पक्षी असून, त्याचे अंदाजे वय ५ वर्ष असून या प्रजातीचे आयुर्माण दहा पंधरा वर्ष असते. नाकतोडे, कीटक, मासे, गांडुळ हे त्याचे मुख्य खाद्य आहे. सध्या तो अत्यवस्थ आहे.’’ (वार्ताहर)