शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

वृद्धेच्या वाट्याला खुराड्यातील जीणे

By admin | Updated: June 15, 2016 05:08 IST

वय वर्षे ६५. खुब्याची शस्त्रक्रिया झालेली. पायाने अधू अशा परिस्थितीत जिन्याच्या पायऱ्या चढणे-उतरणे कठीण असल्याने साखरबाई सोपान शिंदे ही वृद्ध महिला वर्षभरापासून सहाव्या

पिंपरी : वय वर्षे ६५. खुब्याची शस्त्रक्रिया झालेली. पायाने अधू अशा परिस्थितीत जिन्याच्या पायऱ्या चढणे-उतरणे कठीण असल्याने साखरबाई सोपान शिंदे ही वृद्ध महिला वर्षभरापासून सहाव्या मजल्यावरून खाली येऊ शकली नाही. महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पिंपरीतील मिलिंदनगर येथे घर मिळाले. वृद्ध, अपंग लाभार्थ्यांना प्राधान्याने खालच्या मजल्यावर सदनिका देण्याचे महापालिकेचे धोरण असताना, साखरबाई यांना साई संतोष हौसिंग सोसायटीत सहाव्या मजल्यावरील घर मिळाले. सुरुवातीचे दोन-तीन महिने लिफ्ट सुरू होती. नंतर ती बंद झाली. तेव्हापासून साखरबार्इंच्या वाट्याला खुराड्यातील जीणे आले. मोकळ्या हवेतील श्वास कधी मिळणार या आशेवर त्या आहेत. महापालिकने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत साखरबार्इंना सहाव्या मजल्यावर सदनिका दिली. पुनर्वसन प्रकल्पात हक्काचे घर मिळेल या आशेवर चार वर्षे पत्राशेडमध्ये हलाखीचे दिवस काढले. चोहोबाजूंनी पत्रे लावलेल्या खोलीत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या सर्व ऋतूंत एकेक दिवस ढकलत कधी एकदा हक्काचे घर मिळते, अशी अपेक्षा बाळगून त्यांनी गैरसोर्इंशी सामना केला. एकदाचे घर मिळाले. परंतु स्थानिक कार्यकर्त्यांच्या डावपेचाचा परिणाम म्हणून त्यांना पहिल्याऐवजी सहाव्या मजल्यावरील सदनिका दिली गेली. वृद्ध, अंध, अपंग यांच्यासाठी खालच्या मजल्यावर सदनिका उपलब्ध करून देण्याचे धोरण असताना, साखरबार्इंना मात्र वृद्ध आणि पायाने अधू असूनही खालच्या मजल्यावरील घर दिले नाही. धडधाकट असलेल्यांनी वशिलेबाजीने खालच्या मजल्यावरील सदनिकांचा ताबा मिळविला. काहींनी त्या सदनिका भाड्याने दिल्या, तर काहींनी थेट विक्रीच केली. (प्रतिनिधी)करारानुसार सुरुवातीची पाच वर्षे लिफ्टची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असली, तरी लिफ्ट दुरुस्तीसाठी कोणी येत नाही. झोपडपट्टीतून पुनर्वसन प्रकल्पात स्थलांतरित केलेल्या सदनिकाधारकांना लिफ्ट देखभाल-दुरुस्तीचा खर्च पेलवत नाही.सहावा मजला : हतबलता संपणार कधी?मिलिंदनगर पुनर्वसन प्रकल्पात साई संतोष हौसिंग सोसायटीतील सहाव्या मजल्यावर ६०२ क्रमांकाची सदनिका साखरबाई शिंदे यांच्या नावे आहे. काठीचा आधार घेत तिथल्या तिथे पाय मोकळे करण्यासाठी थोडीशी हालचाल होते. एकेक दिवस खाटेवर पडून घालवण्याची वेळ आल्याने नैराश्य आले असल्याचे साखरबाई सांगतात. बाहेर जाता येत नाही. वर्षभरात कोणाच्या शुभकार्यात सहभागी होता आले नाही. मोकळ्या हवेत फेरफटका मारता आला नाही. पायाने अधू असल्याने खालच्या मजल्यावर सदनिका देऊ, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. एक अधिकारी बदलून गेले. दुसरे आले; परंतु आतापर्यंत गांभीर्याने विचार केला नाही. मुलगा दवाखान्यात अ‍ॅडमिट आहे. पाहण्यास जाण्याची इच्छा आहे, परंतु जाता येत नाही. ही हतबलता संपणार तरी कधी, असा सवाल त्यांनी उद्विग्नपणे उपस्थित केला.

सुरुवातीचे दोन-तीन महिने लिफ्ट सुरू असताना, जेवढ्या वेळा साखरबाई सहाव्या मजल्यावरून खाली आल्या. तेवढीच मोकळ्या हवेतील श्वास घेण्याची संधी त्यांना मिळाली. आता त्या सहाव्या मजल्यावर घराच्या बाहेर एका खाटेवर पडून आहेत. जिना चढणे-उतरणे त्यांना शक्य होत नाही. पॅसेजमध्ये बसून बसून त्यांचे वजनही वाढले आहे.