शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

साहित्य संमेलन यशस्वी करावे

By admin | Updated: August 22, 2015 02:07 IST

पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात स्थानिकांना सहभागी करून घ्यावे. स्थानिक साहित्यिक, साहित्य रसिकांनी संमेलन

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात स्थानिकांना सहभागी करून घ्यावे. स्थानिक साहित्यिक, साहित्य रसिकांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित साहित्यिक मेळाव्यात करण्यात आले.रस्टन कॉलनी (प्राधिकरण) येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात साहित्यिक व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. साहित्यिक, रसिक आणि अपेक्षित कार्यक्रमांची यादी तयार करण्यात आली.नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव म्हणाले, ‘‘शहरात साहित्य संमेलन भरत आहे, याचा साहित्यिक, रसिकांना अभिमान वाटतो. हे संमेलन ऐतिहासिक संमेलन ठरावे म्हणून आमची भूमिका पार पाडू. स्थानिक साहित्यिकांनी एकत्र येऊन घरच्या या सोहळ्यास हातभार लावावा.’’ साहित्य मंचचे राजेंद्र घावटे म्हणाले, ‘‘दुष्काळाच्या सावटात हे संमेलन होत आहे, याची जाणीव ठेवून संमेलन साध्या पद्धतीने व्हावे. स्थानिकांना विश्वासात घेऊन संमेलन व्हावे. ही संतांची भूमी आहे. त्यामुळे हे संमेलन आदर्श संमेलन ठरावे.’’ साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले, ‘‘प्रत्येकाला त्यांच्या पात्रतेप्रमाणे सहभागी करून घ्यावे. संयोजकांनी स्थानिकांचा एक मेळावा आयोजित करावा.’’ पिंपरी-चिंचवड मनपाचे सदस्य गोरक्ष लोखंडे म्हणाले, ‘‘महापालिकेतर्फे स्थानिकांसाठी निश्चित प्रयत्न करू. मनपाने जे सांस्कृतिक धोरण स्वीकारले आहे, त्याचे चांगले पडसाद उमटत आहेत.’’या वेळी नंदकुमार मुरडे, अशोक कोठारी, नितीन यादव, सुहास घुमरे, वर्षा बालगोपाल, सविता इंगळे, सुभाष चव्हाण, डॉ. सोमनाथ सलगर, प्रदीप गांधलीकर, शोभा जोशी, बशीर मुजावर आदींनी मनोगत व्यक्त केले. मंगेश पोहणेकर, अनिकेत गुहे, अ‍ॅड. अंतरा देशपांडे यांनी संयोजन केले. स्थानिक साहित्यिक, कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधींना संयोजनात समाविष्ट करावे, मंडप आणि द्वाराला संतांची नावे द्यावीत, डॉ. डी. वाय. पाटील यांच्या नावाला साजेसे उपक्रम व व्यवस्थापन व्हावे, अध्यक्ष निवड प्रक्रिया वादविरहित व्हावी, स्थानिकांना २५ मतांचा अधिकार मिळावा, भोजन साधे व शाकाहारीच असावे, दर कमीत कमी ठेवावा, चहा-पाणी, निवास, सर्वसामान्यांना अल्पदरात करून द्यावी, रसिकांनाही सन्मानाची वागणूक मिळावी, स्थानिक मंडळांना सामावून घ्यावे, विविध संस्था मंडळातील कार्यकर्त्यांची बैठक संयोजन समितीने घ्यावी, वक्तृत्व स्पर्धा, अभिवाचन आदी साहित्यप्रकार घ्यावेत.दरम्यान, हे साहित्य संमेलन भरविण्याचा मान पिंपरी-चिंचवडला मिळाल्याबद्दल साहित्यिकांना आनंद झाला. या काळात साहित्याची परवणी मिळणार आहे. तसेच नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन मिळणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)