शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

साहित्यिकांनी मते थोपवू नयेत : न. म. जोशी

By admin | Updated: February 22, 2015 00:43 IST

साहित्यिकाने कधीही उपदेश करायचो नसतो. आपली मते कोणावरही थोपवायची नसतात.

पुणे : साहित्यिकाने कधीही उपदेश करायचो नसतो. आपली मते कोणावरही थोपवायची नसतात. त्यामुळे समाजातील काही संकुचित मनोवृत्तीच्या व्यक्तींबद्दल कधीही स्पष्टपणे न बोलता लेखनातून फटकारे मारले. त्यांना हेच जास्त झोंबते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.निनाद संस्थेतर्फे डॉ. जोशी यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त ‘ज्ञानयोगी गौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. या वेळी त्यांनी आतापर्यंतच्या वाटचालीत आलेले अनुभव, आठवणी उपस्थितांसमोर दिलखुलासपणे मांडल्या. भरत नाट्य मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. या वेळी नगरसेवक दिलीप काळोखे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, डॉ. दिलीप गरूड, चंद्रकांत सणस, शुभदा जोशी, उदय जोशी अनिल गानू आदी उपस्थित होते. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी मुलाखतीतून डॉ. जोशी यांचा जीवनप्रवास उलगडला. डॉ. जोशी म्हणाले, ‘‘सध्याची शिक्षणपद्धती कृत्रिम आहे. सध्या शिक्षक मुलांना शब्दार्थ नव्हे; तर शब्दांचे प्रतिशब्द शिकवितात. तंत्रज्ञानाचे माणुसकीवर आक्रमण होत असून त्याचा अतिरेक होऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भेटीची आठवणही डॉ. जोशी यांनी या वेळी सांगितली.’’ डॉ. जोशी यांचा गौरव करताना बापट म्हणाले, ‘‘न. म. म्हणजे ‘न’त ‘म’स्तक व्हावे, असे व्यक्तिमत्त्व आहे. स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग समाजातील सर्व स्तरांतील लोकांना करून देत असताना त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच आनंद दिसतो.’’ ‘‘शिक्षक समाजाचे नेतृत्व करीत असल्याचा एक काळ होऊन गेला. आज ही परंपरा खंडित झाली आहे,’’ अशी खंत डॉ. मुजुमदार यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)