शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मद्यदुकानांना लागले अखेर कुलूप

By admin | Updated: April 2, 2017 02:49 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शनिवारपासून महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या आत असलेले वाईन्स शॉप्स आणि रेस्टॉरंट्स अ‍ॅण्ड बार बंद करण्यात आले.

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शनिवारपासून महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या आत असलेले वाईन्स शॉप्स आणि रेस्टॉरंट्स अ‍ॅण्ड बार बंद करण्यात आले. त्याचा फटका जवळपास ८० टक्के हॉटेल्स आणि मद्य विक्रेत्यांना बसला. परिणामी मद्य विक्री सुरु असलेल्या तुरळक ठिकाणी मद्यप्रेमींची गर्दी उसळली होती. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या वाईन्स शॉप्स आणि बार बंद करण्याचा निर्णय दिला आहे. शहरात महामार्गालगत १९५० बार असून, जवळपास पाचशे वाईन्स शॉप्स आहेत. शहरात पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक, मुंबई-बेंगळुरु महामार्ग आणि नगर रस्ता असे महामार्ग जातात. या निर्णयाचा फटका शहर हद्दीतून जाणाऱ्या महामार्गालगतच्या वाईन्सशॉप्स आणि बारला देखील बसला आहे. पुणे रेस्टॉरंट्स हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, शहर हद्दीतून जाणारे महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेकडे हस्तांतरीत केले आहेत. येथील वाईन्स आणि बार चालकही महापालिकेकडे कर भरतात. मात्र, महापालिकेने रस्ते हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न केल्याने येथील वाईन्स आणि बार चालकांवर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे शहरातील ८० टक्के बार आणि वाईन्स शॉप चालकांना फटका बसला. इंडियन ग्रेप असोसिएशन बोर्डाचे माजी अध्यक्ष, जगदीश होळकर म्हणाले, हॉटेल्सच्या माध्यमातून वाईन्स अथवा इतर पेय घेणाऱ्यांची संख्या ७० टक्के इतकी आहे. तर केवळ तीस टक्के व्यक्ती वाईन्स शॉप्समधून खरेदी करतात. या निर्णयामुळे राज्यातील ८० टक्के वाईन्स आणि बार बंद होते. याचा फटका वाईन या आरोग्यदायी पेयाला देखील बसला आहे. खरेतर वाईन आणि इतर मद्य असा फरक सरकारने केला पाहीजे. याबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा.(प्रतिनिधी)