शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांचा पत्र ते मोबाइल प्रवास व्हाया एसटीडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 02:22 IST

पाऊले चालती पंढरीची वाट, असे म्हणत सध्या लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. या प्रवासात काहीतरी वेगळे दिसले की अनेक वारकरी आपल्या खिशातून मोबाइल काढून फोटो किंवा सेल्फी काढताना दिसतात.

पुणे - पाऊले चालती पंढरीची वाट, असे म्हणत सध्या लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. या प्रवासात काहीतरी वेगळे दिसले की अनेक वारकरी आपल्या खिशातून मोबाइल काढून फोटो किंवा सेल्फी काढताना दिसतात. तसेच प्रवासाची माहितीदेखील अगदी सहजपणे मोबाइलच्या माध्यमातून घरच्यांना देत आहेत. मात्र सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी ही सर्व परिस्थिती पूर्णत: वेगळी होती.मोबाइलच्या उपलब्धतेमुळे सध्या वारकरी व त्यांचे कुटुंबीय काही क्षणांत एकमेकांशी कनेक्ट होत आहे. मात्र, दोन ते तीन दशकांपूर्वी वारकºयांना कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी टपालसेवा हे सक्षम व माफक माध्यम होते. त्या काळी टपाल खात्याने वारीतही पत्र पोहोचविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली होती. घरी काही महत्त्वाची घटना घडली, तर वारीच्या वाटेवर तारही येत होती. मात्र, वारकºयांच्या हातात मोबाइल आल्याने वारीतील टपालचे प्रमाण कमी झाले आहे.वारीत सहभागी झालेल्याचे नाव व मुक्काम पोस्ट आणि संत ज्ञानेश्वर महाराज की संत तुकारामांची पालखी, त्यातील दिंडी क्रमांक असा पत्ता पत्रावर टाकला की त्या-त्या वारकºयापर्यंत पत्र पोहोचत होते. राज्यातील कोणत्याही टपाल कार्यालयात वारीचे पत्र आले की, ते प्रथम पुणे किंवा पंढरपूरच्या टपाल कार्यालयांमध्ये जमा होई. त्यानंतर पालखी मुक्कामाच्या स्थळापासून जवळच्या गावातील टपाल कार्यालयात हे पत्र पाठविले जात होते. त्या-त्या गावातील पोस्टमन पालखी सोहळ्याच्या चोपदाराकडे पत्र देत. साधारण दुपारच्या जेवणानंतर पालखी मार्गस्थ होत असताना एका ठिकाणी थांबून चोपदार त्या-त्या दिंडीत पत्रांचे वाटप करत असे.असे पाठवले जात वारीतून पत्रवारीत पत्र येण्याबरोबरच वारीतून पत्र पाठविण्याचीही खास व्यवस्था होती. पालखी मुक्कामाच्या गावात काही शाळा हा उपक्रम राबवीत होत्या. लोणंद येथील शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे दहा-पंधरा पोस्टकार्ड दिली जायची. घरी पत्र पाठविण्याची इच्छा असलेले वारकरी या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांकडून पत्र लिहून घेत.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPuneपुणे