शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील विकास कामे सुरू करण्यासाठी महापालिकेचे शासनाला पत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:33 IST

२०२०-२१ च्या अंदाजपत्रकात सुचविलेल्या विकास कामांच्या निविदा काढण्यास मंजुरी द्यावी..

ठळक मुद्देराज्य शासनाची मान्यता आल्यावरच संबंधित विकास कामांची वर्क ऑर्डर काढली जाईल

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आलेली शहरातील विविध विकास कामे सुरू करण्यासाठी राज्य शासनाने मंजूरी द्यावी. या विकास कामांसाठी आवश्यक महसूल महापालिका स्तरावर उभारला जाईल, असे पत्र पुणे महापालिकेने राज्य शासनाकडे सादर केले आहे़     कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे महापालिकांनी अत्यावश्यक विकास कामांवर केवळ ३३ टक्केच खर्च करावा असे आदेश दिले होते. यामुळे गेल्या साडेचार महिन्यात पुणे महापालिकेकडून कोरोना संदर्भातील उपाययोजनांवरील खर्च व पावसाळी कामे वगळता अन्य कुठल्याही नव्या विकास कामांच्या निविदा काढण्यात आल्या नाहीत.     दरम्यानच्या काळात शहरात रखडलेली विकास कामे सुरू करण्याबाबत पालिकेतील सत्ताधारी पक्षाने राज्य शासनाकडे वारंवार विनंती केली होती़. आता मिळकत करातून व अन्य स्त्रोतातून जुलैअखेरपर्यंत पालिकेने दीड हजार कोटी रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे़ व पुढील सहा सात महिन्यात पालिकेला आणखी ५ हजार कोटी रूपये उत्पन्न मिळेल असा विश्वास आहे. या पार्श्वभूमीवर सन २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात सुचविलेल्या विकास कामांच्या निविदा काढण्यास मंजुरी द्यावी़ अशी विनंती राज्य शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली आहे. तर या विकास कामांसाठीच्या महसूली खर्चाची तरतूद पालिका स्तरावरच आम्ही करू असेही त्यांनी या पत्रात आश्वस्त करण्याचे प्रशासनास सांगितले आहे.     यानुसार महापालिका प्रशासनाने राज्य शासनास पत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर सध्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आली तरी, राज्य शासनाची मान्यता आल्यावरच संबंधित विकास कामांची वर्क ऑर्डर काढली जाईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.       --------------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या