शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST

कालिदास नगरे लोकमत न्यूज नेटवर्क पिरंगुट : उरवडे येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजी कंपनीला कामगार राज्यमंत्री बच्चू ...

कालिदास नगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

पिरंगुट : उरवडे येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजी कंपनीला कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट देऊन पाहणी केली. या कंपनीच्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांचे आम्ही लवकरच पुनर्वसन करू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजी या कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. आगीची परिस्थिती तीव्रता भयानक होती की या कंपनीमधील सर्व जळून खाक झाले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखत कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

बच्चू कडू म्हणाले, गेल्या दहा वर्षांतील राज्यातील ही सर्वात मोठी व गंभीर घटना आहे. कामगारांच्या सुरक्षेची कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने कोणतीही काळजी घेतली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. ज्या कामासाठी परवानगी घेतली होती, त्याऐवजी दुसरेच उत्पादन या ठिकाणी सुरू असल्याचे दिसत आहे, तर या घटनेची योग्य ती चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

मृत पावलेल्या कामगारांना योग्य ती मदत मिळवून दिले जाईलच. सर्व कामगार हे सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना मदत तर दिली जाईलच. परंतु त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. येत्या पंधरा दिवसांत त्यांचे पुर्नवसन केले जाईल. कंपनीच्या निष्काळजीपणाच या घटनेला कारणीभूत असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या वेळी आवर्जून सांगितले.

फोटो ओळ : पिरंगुट येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एस.व्ही.एस कंपनीची पाहणी करताना राज्यमंत्री बच्चू कडू.