दत्तात्रय जगताप यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू आहे. शाळा बंद असल्यामुळे या ऊसतोड मजुरांच्या सोबत १६ मुले आली होती.ही गोष्ट ज्यावेळी जगताप यांना समजली तेव्हा त्यांनी या मुलांची भेट घेतली. त्यावेळी काही मुलांनी आम्हालाही शिकवा अशी विनवणी केली. यामुळे जगताप यांचे डोळे पाणावले. त्यांनी तत्काळ या मुलांसाठी वह्या ,पुस्तक पाटी, पेन्सील, मास्क घेऊन आले. शेतातील आंब्याच्या झाडाखाली बसून त्यांनी मुलांना धडे देण्यासही सुरुवात केली. जगताप यांच्या उपक्रमाचे गावात कौतुक होत आहे. यावेळी शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते उपस्थित होते.
जगताप यांच्या उपक्रमांचे माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, गट शिक्षण अधिकारी राजेसाहेब लोंढे , विस्तार अधिकारी महादेव बाजारे यांनी अभिनंदन केले.
०९ टाकळी हाजी.
ऊसतोड मजुरांच्या मुलांना शालेसाहित्य वाटपप्रसंगी दत्तात्रय जगताप.