शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

वनविभागाच्या हातावर बिबट्याची तुरी

By admin | Updated: May 21, 2015 23:01 IST

बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या पिंजरा तोडून पळाला़ हा प्रकार वनविभाग व स्थानिक नागरिकांना गुरुवारी पहाटे पाचच्या दरम्यान लक्षात आले.

मढ : डिंगोरे (ता. जुन्नर) येथे बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या पिंजरा तोडून पळाला़ हा प्रकार वनविभाग व स्थानिक नागरिकांना गुरुवारी पहाटे पाचच्या दरम्यान लक्षात आले. अडकलेल्या बिबट्याने धडका देऊन पिंजऱ्याच्या गजाचे दार तोडून त्यातून आपली सुटका करून घेतली.बिबट्या पळाल्याचे समजताच नागरिकांनी वन विभागाबद्दल नाजारी व्यक्त करून वनविभागाकडे असलेले पिंजरे व इतर साधनसामग्री जीर्ण झाली असल्याचा आरोप केला आहे.डिंगोरे येथे साई मंडलिक या बालकाला बिबट्याने हल्ला करून ठार केले तसेच इतर पाळीव प्राण्यांवरही मोठ्या प्रमाणात हल्ले सुरूच आहेत़ त्यामुळे या पार्श्वभूमीवर वन विभागाने डिंगोरे परिसरात दत्तवाडी व नांदई परिसरात तीन पिंजरे व आमले शिवार व भलेवाडी परिसरात चार पिंजरे लावले़ त्यात दत्तवाडी व नांदई परिसरातील पिंजऱ्यात एक बिबट्याची मादी जेरबंद झाली़ परंतु डिंगोरे आमले शिवारातील कुलवडे मळा रोड येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद होऊनही पिंजरा कमकुवत असल्यामुळे पिंजऱ्याला धडका देऊन देऊन बिबट्याने सुटका करून घेतली, असे नागरिकांचे म्हणणे आहे़ परिसरातील नागरिकांनी या परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्याबरोबरच बिबट्या दिसताक्षणी गोळ्या घालायचे आदेश शासनाने द्यावेत, अशी मागणी केली आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान यांनी पिंजरा तोडून बिबट्या पळाल्याचे मान्य केले़ तसेच, वनविभागाकडून परिसरातील पिंजऱ्याची तपासणी चालू आहे, असे सांगितले. अहिनवेवाडी येथे बिबट्याने काल रात्री एका शेतकऱ्याची शेळी ठार केली. या घटनेलाही त्यांनी दुजोरा दिला.बिबट्या हा अतिशय ताकदवान आणि हुशार प्राणी आहे़ त्याने दरवाजातील कमकुवत बाजू लक्षात घेऊन त्याला धडका देऊन आपली सुटका करून घेतली असावी, असे उपवनसंरक्षक व्ही़ ए़ धोकटे यांनी सांगितले़ धोकटे म्हणाले, की डिंगोरे येथे लावलेल्या पिंजऱ्यातच काही दिवसांपूर्वी आमले शिवारातील कुलवडेमळा रोडला एक बिबट्या अडकला होता़ त्या मादीच्या वासाने हा बिबट्या येऊ शकेल, या हेतूने हा पिंजरा लावला होता़ त्यात कोणताही हलगर्जीपणा नसतो़ सर्वांसमक्ष पिंजरा लावला जातो़ रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने कोणाला बिबट्याचा आवाज आला नाही़ जुन्नर वनविभागाकडे बिबटे पकडण्याचे एकूण ४० पिंजरे असून, यापैकी २४ ते २५ सुस्थितीत आहेत. उर्वरित नादुरुस्त आहेत. प्रत्येक वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे प्रत्येकी ५ ते ६ पिंजरे उपलब्ध आहेत. (वार्ताहर)४बिबट्या हा प्राणी हुशार आहे़ कोणताही प्राणी जिवाच्या आकांताने त्यातून सुटण्याचा प्रयत्न करत असतो़ त्यात काही वेळा त्यांना यश येऊन पिंजऱ्यातून बिबटे पळाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत़ उंब्रज येथे एका घरात शिरलेल्या बिबट्याला पकडून कोयनेच्या जंगलात सोडण्यात येत होते़ त्या वेळी तो वाटेतूनच पिंजरा तोडून पळून गेला होता़ अशा काही घटना घडल्या असल्याचे व्ही. ए. धोकटे यांनी सांगितले़ज्या ज्या ठिकाणी पिंजरे लावले आहेत,त्या ठिकाणची गस्त वाढवली जाणार असून, ट्रॉक्युलाइझर टीमची मदत घेतली जाणार आहे़ अशा घटना घडू नयेत, याची दक्षता घेत आहोत.- सचिन रघतवान, वनपरिक्षेत्र अधिकारी पिंजरे तपासणार४ही घटना लक्षात घेऊन लावलेले सर्व पिंजरे तपासण्यासाठी एक पथक पाठविण्यात आले आहे़ त्यांच्याबरोबर वेल्डिंग मशीनसह कामगार देण्यात आला आहे़ ते सर्व पिंजरे तपासणार आहेत़