शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकूर पिंपरी येथे बिबट्या वन विभागाने केला जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:45 IST

ठाकूर पिंपरी परिसर तसा महामार्गावरून आडवळणी आणि डोंगरालगत असल्याने या भागात वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

आंबेठाण : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ठाकूर पिंपरी (ता. खेड) येथे भरदिवसा शिकारीच्या शोधात असलेला बलदंड बिबट्या शनिवारी फिरत होता, याची माहिती येथील वन विभाग व माणिकडोहमधील बिबट्या निवारा केंद्राला मिळाली. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने सापळा लावला. मात्र, बिबट्या हुलकावणी देत होता. अखेर रेस्क्यू पथकाने साहसाने बिबट्याच्या जवळ जात त्याला बेशुद्ध केले. यानंतर वनखात्याने त्याला जेरबंद केले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ठाकूर पिंपरी परिसर तसा महामार्गावरून आडवळणी आणि डोंगरालगत असल्याने या भागात वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या या परिसरात नागरिकांना आढळून आला होता. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती येथील वनविभागाचे कर्मचारी आणि जुन्नर बिबट्या निवारा केंद्राच्या जवानांना कळविली. त्यामुळे संबंधित ठिकाणी मोठ्या धाडसाने त्यांनी सापळा लावला. बिबट्या निवारण केंद्राच्या जवानांनी त्या ठिकाणी जीव धोक्यात घालून बिबट्याला पकडण्यासाठी युद्धपातळीवर चित्तथरारक बचावकार्य सुरू केले. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास ठाकुर पिंपरी गावकºयांना हा बिबट्या दिसला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यांनी ही माहिती वनविभाग आणि जुन्नर बिबट्या निवारा केंद्राच्या जवानांना याबाबतची माहिती कळवून त्यांना घटनास्थळी येण्याची विनंती केली. संबंधित विभागाचे कर्मचारी येथे क्षणाचाही विलंब न करता अल्पावधीत आले. मात्र, जवान व कर्मचारी येथे दाखल होईपर्यंत हा बलदंड बिबट्या येथे घनदाट दाट झुडपांमध्ये दडून बसला. सापळा लावूनही बिबट्या हातातून निसटला, तर मोठा धोका निर्माण होईल, या भीतीने नागरिक भयभीत झाले होते. रेस्क्यू टीमला त्याला जिवंत जेरबंद करण्यात झुडपांचा अडसर येत होता. बराच वेळ झाला तरी बिबट्या झुडपातून बाहेर येत नसल्याने तो आजारी असल्याचे लक्षात आले. रेस्क्यू टीमचे दोन जवान स्वत:चा जीव धोक्यात घालून बिबट्या ज्या ठिकाणी दडून बसला आहे, त्या ठिकाणी त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्याला डॉट मारण्यात आले. बिबट्या बेशुद्ध पडल्याची पक्की खात्री होताच सर्वांनी त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले.ठाकूर पिंपरी येथून बलदंड बिबट्याला मोठ्या चित्तथरारक परिस्थितीत आणि बेशुद्धावस्थेत ताब्यात घेतल्यानंतर रात्री उशिरा त्याच्यावर जुन्नर बिबट्या निवारा केंद्रात तातडीचे उपचार सुरूकरण्यात आले.- डॉ. विकास देशमुख, जुन्नर बिबट्या निवारा केंद्राचे अधिकारीकोणत्याही ठिकाणी संशयास्पद वन्यप्राणी आढळून आल्यास नागरिकांनी मुळीच घाबरून जाण्याचे कारण नाही, तातडीने वनविभागाशी संपर्क साधण्याची गरज आहे.- एन. एम. खताळ,वनाधिकारी.

टॅग्स :Puneपुणे