शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जुन्नर तालुक्यात सावज पकडण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 15:25 IST

पिंपळझाप शिवारात सावज पकडण्याच्या नादात एक बिबट्या सोमवारी (दि.१५ आॅक्टो) विहिरीत पडला. भुलीचे इंजेक्शन (डार्ट) देऊन बेशुध्द केल्यावर बिबट्याला बाहेर काढण्यात आले.

ठळक मुद्देजवळपास पाच तास हे रेस्क्यु टिमचे प्रयत्न सुरु

जुन्नर : गुळूंचवाडी(ता.जुन्नर)येथील पिंपळझाप शिवारात सावज पकडण्याच्या नादात एक बिबट्या सोमवारी (दि.१५ आॅक्टो) विहिरीत पडला. कपारीत लपुन बसलेल्या बिबट्याला वनखात्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी भुलीचे इंजेक्शन मारुन अखेर पिंज-यात जेरबंद करत विहिरीतून बाहेर काढले.     सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळझाप शिवारातील तुकाराम दगडु औटी यांची सामुहिक विहीर आहे. सोमवारी सकाळी तुकाराम औटी मोटार चालु करण्यासाठी गेले असता त्यांनी विहिरीत डोकावले. त्यावेळी त्यांना  पाईपाला धरुन बसलेला बिबट्या दिसला. त्यांनी या घटनेची माहिती उपसरपंच बाबाजी एरंडे यांच्यासह काही महत्वाच्या व्यक्तींना दिली. तत्काळ या मंडळींनी बिबट्या विहिरीत पडला असल्याचे वनखात्याच्या कर्मचा-यांना कळविले. त्यानंतर वनरक्षक डी.डी.फापाळे,वनमजुर जे.टी.भंडलकर,बी.सी.येळे,बी.एस.शेळके हे घटनास्थळी दाखल झाले. या विहिरीलाच लागुन दुसरी अरुंद विहीर आहे. त्या विहिरीला मोठे भुयार आहे. बिबट्या या भुयारामार्गे दुस-या अरुंद विहिरीतील असणाऱ्या मोठ मोठ्या कपारीत जावून लपला. त्यामुळे विहिरीत असूनही बिबट्या दिसत नव्हता. वनखात्याचे पशुवैद्यकीय य अधिकारी व कर्मचा-यांनी त्याला पाहण्यासाठी विहिरीत कॅमेरा सोडला. त्यानंतर हॅलोजनचे लाईट लावुन पाहिले तसेच फटाके दोरीला बांधुन विहिरीत फोडले तरीही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर वनखात्याच्या कर्मचा-यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडला तरीही त्यामध्ये बिबट्या आला नाही. शेवटी या अरुंद विहिरीतील बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन वर काढण्याचा निर्णय माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राच्या अधिका-यांनी घेतला.यावेळी पिंज-यात बसुन डॉ.अजय देशमुख व डॉ.महेंद्र ढोले हे विहिरीत उतरले. त्यांना विहिरीच्या कपारीत बिबट्या लपलेला दिसला.त्यांनी त्या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन (डार्ट) देऊन बेशुध्द केले. त्यानंतर लगेच थोड्या वेळाने बिबट्या बेशुध्द झाल्यानंतर त्याला लगेचच पाण्यातुन बाहेर काढुन पिंज-यात जेरबंद करुन वर काढले. याठिकाणी जवळपास पाच तास हे रेस्क्यु टिमचे प्रयत्न चालु होते. पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलविले आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरleopardबिबट्या