शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बिबट्या गायब; भेकर, सांबराचे दर्शन

By admin | Updated: May 7, 2015 04:44 IST

भीमाशंकर अभयारण्यात बुध्द पौर्णिमेच्या रात्री जंगलात असलेल्या २८ पाणवठ्यांच्या ठिकाणी झालेल्या प्राणीगणनेत जुन्नर तालुक्यात दहशत पसविणाऱ्या बिबट्याचे दर्शन झाले नाही.

भीमाशंकर अभयारण्य : बुद्ध पौर्णिमेला झाली प्राणीगणनाघोडेगाव : भीमाशंकर अभयारण्यात बुध्द पौर्णिमेच्या रात्री जंगलात असलेल्या २८ पाणवठ्यांच्या ठिकाणी झालेल्या प्राणीगणनेत जुन्नर तालुक्यात दहशत पसविणाऱ्या बिबट्याचे दर्शन झाले नाही. मात्र भेकर, सांबर, मोर, पानकोंबडे दिसून आले. लाकूडफाटा व पालापाचोळ्यांनी बनविलेल्या मचाणात बसून वन्यप्राण्यांची गणना व निरीक्षण करण्यात आले. यामध्ये अनेक हौशी निसर्गप्रेमींही सहभागी झाले होते. मे महिन्यात येणाऱ्या बुध्द पौर्णिमेला भीमाशंकर वन्यजीव विभाग ‘पाणस्थळांवरील प्राणीगणना’ करते. कडक उन्हाळयाच्या मे महिन्यात जंगलात पाणी मोजक्याच ठिकाणी शिल्लक असते व पौर्णिमेच्या रात्री उजेडामुळे प्राणी दिसणे सोपे जाते, म्हणून बुध्द पौर्णिमेला प्राणीगणना केली जाते. पाणवठ्याच्या ठिकाणी पालापाचोळ्यांनी बनविलेल्या मचाणात बसून पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांवर लक्ष ठेवले जाते व त्यांचे निरीक्षण व गणना केली जाते. वन्यजीव विभागाने काही पाणवठ्यांच्या जागी लोखंडी टॉवर उभे केले आहेत. या ठिकाणी निसर्गप्रेमी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बसून प्राण्यांचे निरीक्षण केले. एक रात्र जंगलात घालवून वन्यप्राणी पाहण्याचा चित्तथरारक अनुभव प्राणीगणनेतून हौशी निसर्गप्रेमींना मिळाला. भीमाशंकर वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे व वनक्षेत्रपाल तुषार ढमढेरे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी जंगलातील २८ पाणवठ्यांच्या ठिकाणी निसर्गप्रेमी व वनकर्मचारी बसवून गणना केली. यामध्ये वांगीणदरा, घाटघर, चौरा, भट्टीचेरान, कुंभारखान, वेल्होळी, उघडी कळमजाई, कोथीरणे, वाजेवाडी, भाकादेवी, विरतळे, संगमतळे, साकेरी तलाव, कारवीचादरा, वनस्पती पॉर्इंट या पाणवठ्यांच्या ठिकाणी गणना करण्यात आली. (वार्ताहर)----------> मागील एक महिन्यात अनेक वेळा झालेल्या अवकळी पावसामुळे जंगलात भरपूर ठिकाणी पाणी होते. त्यामुळे पाणवठ्यांवर प्राणी कमी प्रमाणात आले. सांबर, भेकर, मोर, ससे, रानकोंबडी, उदमांजर, रानडुक्कर असे प्राणी आढळून आले. प्राण्यांबरोबरच त्यांची विष्टा, पायाचे ठसे, लोळण घेण्याची ठिकाणे यांचीही माहिती घेण्यात आली. > चंद्राचा प्रकाश प्रखर असल्यामुळे व रात्री खूप उशीरा धुके पडल्यामूळे बराच वेळ निसर्गप्रेमींना पाणवठ्यांचे निरीक्षण करता आले. भीमाशंकरमध्ये रात्री कडाक्याची थंडी पडली होती. निसर्गप्रेमींनी हिवाळ्यासारख्या कडाक्याच्या थंडीला रात्रभर सामोरे जावे लागले. > पूर्वी या कार्यक्रमाला ‘व्याघ्रगणना’ असे म्हटले जात होते. परंतू जंगलामधून पट्टेरी वाघ नामशेष झाले. आता त्यापाठोपाठ बिबटेही जंगल सोडून सधन भागांत जाऊ लागले. त्यामुळे या गणनेला नंतर फक्त ‘प्राणीगणना’ असे म्हटले जाऊ लागले. परंतू दिवसेंदिवस जंगलातून प्राणीही कमी होऊ लागल्याने आता याला ‘पाणस्थळांवरील प्राणी गणना व निरीक्षण’ असे म्हटले जात आहे. भविष्यात जंगलातून प्राणी नामशेष होतील, तेव्हा याचे नामकरण ‘पाणस्थळांचा अभ्यास व विकास’ असे झाल्यास काही वावगे ठरणार नाही. > सहभागी निसर्गप्रेमींना ओळखपत्र देण्यात आली होती. या ओळखपत्रासोबत सूचना व घ्यावयाच्या दक्षता यांची माहिती देण्यात आली. > यामध्ये मचाणावर बसल्यानंतर एकमेकांशी बोलू नये, सहभागी निसर्गप्रेमींनी निसर्गाशी एकरूप होणारे कपडे घालावेत, उग्रवास असणारे सुगंधी द्रव्य कपड्यांवर लावू नये, रात्री बॅटरी अथवा विजेचा वापर करू नये, कोणत्याही प्रकारे अन्नपदार्थ, प्लास्टिक बॅग अशा स्वरूपाच्या वस्तू जवळ बाळगू नये, मचाण चारही बाजूंनी हिरव्या फांद्यांनी झाकून घ्यावे, अशा स्वरूपाच्या सूचना सहायक वनसंरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे यांनी दिल्या होत्या. यावर्षी फार कमी प्राणी दिसले. जात आहे. भविष्यात जंगलातून प्राणी नामशेष होतील, तेव्हा याचे नामकरण ‘पाणस्थळांचा अभ्यास व विकास’ असे झाल्यास काही वावगे ठरणार नाही.