शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोळ्या घालून बिबट्याचे हल्ले थांबणार नाहीत

By admin | Updated: June 4, 2015 05:24 IST

बिबट्याचा प्रश्न त्यांना गोळ्या घालून, पिंजऱ्यात पकडून किंवा स्थलांतरित करून सुटणारा नाही. यासाठी जनप्रबोधन होणे गरजेचे आहे.

घोडेगाव : बिबट्याचा प्रश्न त्यांना गोळ्या घालून, पिंजऱ्यात पकडून किंवा स्थलांतरित करून सुटणारा नाही. यासाठी जनप्रबोधन होणे गरजेचे आहे. म्हणून वन विभागाने बिबट्याचा वावर असलेल्या ५९ गावांमध्ये सर्व शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांना एकत्र करून कृती आराखडा तयार केला आहे, असे जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक व्ही. ए. धोकटे यांनी सांगितले. ही ५९ गावे, बिबट्यांचा हल्ला झाल्याच्या अथवा बिबट्या आढळल्याच्या घटना ज्या भागात घडल्या, त्या भागाचा नकाशा तयार करून निश्चित केली आहेत. या गावांमध्ये वन विभागाबरोबरच इतर शासकीय यंत्रणांचा सहभाग घेऊन कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. हा कृती आराखडा या गावांमध्ये राबविण्यासाठी गावे निश्चित केली आहेत. येथील ग्रामस्थांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. या कृती आराखड्यात बिबट्याचा वावर असलेल्या भागात सध्या पहाटे तीन वाजता लाईट जाते व हीच वेळ बिबट्याच्या वावरण्याची असते. त्यामुळे या भागात भारनियमन बंद होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी बिबट्याचा वावर असलेल्या गावांमध्ये अखंडित वीजपुरवठा करणे, प्रत्येक गावात जनप्रबोधन करणाऱ्या शिक्षकांचा, शाळांचा सहभाग करून घेणे, शौचालयासाठी बाहेर जाणाऱ्या ग्रामस्थांवर बिबट्यांचे हल्ले होऊ नयेत यासाठी शंभर टक्के शौचालय बांधून घेणे, पाळीव जनावरांवर हल्ले होऊ नयेत यासाठी बंदिस्त गोठे बांधणे, विहिरींमध्ये बिबटे पडून दुर्घटना घडू नये यासाठी विहिरींना कठडे बांधणे ही कामे केली जाणार आहेत. बिबट्या दिसला की पिंजऱ्यात पकडून घेऊन जा किंवा ठार मारा, अशी जी मागणी लोकांची येते, त्याविषयी जनप्रबोधन होणे गरजेचे आहे. तसेच लोकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी, शासन करत असलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, पकडण्याची कायदेशीर प्रक्रिया लोकांना कळावी यासाठी शासकीय यंत्रणेतील स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, वायरमन यांना प्रशिक्षण देऊन तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच या लोकप्रतिनिधींनाही प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत जनप्रबोधन केले जाणार आहे. हा कार्यक्रम कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आला आहे. माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात असलेले सर्व बिबटे हे जुन्नरमधील नाही. येथे फक्त ४ बिबटे जुन्नरमधील आहेत. बाकीचे बोरवली, धुळे, नाशिक येथून आणलेले बिबटे आहेत. विहिरीत पडलेले बिबटे अथवा रस्त्यावर जखमी सापडलेले बिबटे आपण पकडून ठेवत नाही, तर त्यांच्यावर उपचार करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडतो. जुन्नर परिसरातील लोकांचा या प्राण्यावर जीव आहे. खामुंडीमध्ये वाघदरा म्हणून गाव आहे. येथील लोकांना वाघ नवीन नाही; परंतु डिंगोरे, ओतूर, मढ या भागांत बिबट्याचा जास्तच वावर वाढल्यामुळे लोकांमध्ये या प्राण्याविषयी चीड निर्माण झाली. मागील दोन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्याच्या तीन घटना घडल्या. या कुटुंबांना तातडीने मदत देण्याचे काम वन विभागाने केले. यासाठी शवविच्छेदनाचा अहवाल, मंडल अधिकाऱ्यांचा वारस हक्काचा दाखला, पंचनामा ही कागदपत्रे तातडीने देण्याचे काम सर्वच शासकीय विभागांनी केले. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला आठ लाख रुपये तातडीने देऊ शकलो, असे उपवनसंरक्षक व्ही. ए. धोकटे यांनी सांगितले. (वार्ताहर)