आळेफाटा : रांधे (ता. पारनेर) येथील विठ्ठलवाडी शिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पिकाला पाणी देऊन घरी परतणाऱ्या सखाराम लक्ष्मण आवारी या शेतकऱ्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल केले आहे.बेल्हे येथून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या रांधे (ता. पारनेर) येथील विठ्ठलवाडी शिवारात आज सकाळी साडेसातच्यादरम्यान कांदा या पिकाला पाणी देऊन घरी परतणाऱ्या सखाराम लक्ष्मण आवारी या शेतकऱ्यावर बोरीच्या झाडाच्या आड दबा धरून बसलेल्या बिबट्याने उडी घेत हल्ला केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला, डाव्या डोळ्याजवळ व मानेला जखमा झाल्या. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेची माहिती पारनेर येथील वनविभाग कार्यालयात देण्यात आली असल्याची माहिती रांधे गावचे उपसरपंच संतोष काटे यांनी दिली. (वार्ताहर)
बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला
By admin | Updated: January 4, 2016 01:05 IST