शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गळतीवरून मुख्य सभेत होणार गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 03:24 IST

महापालिकेच्या वतीने तब्बल ४९ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नवीन विस्तारीत प्रशासकीय इमारतीच्या सभागृहाला उद्घाटनच्या दिवशीच गळती लागली.

पुणे : महापालिकेच्या वतीने तब्बल ४९ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नवीन विस्तारीत प्रशासकीय इमारतीच्या सभागृहाला उद्घाटनच्या दिवशीच गळती लागली. तसेच उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन यावरून विरोधकांकडून गुरुवारी (दि.२८) होणाऱ्या मुख्य सभेत सत्ताधारी भाजपाला चांगलेच धारेवर धरण्यात येणार आहे. या शिवाय खाससी कंपन्यांच्या प्रस्तावावर वेळेत अभिप्राय न दिल्याने पीएमपीच्या कोणत्याही प्रस्तावावर निर्णय घेऊ नका, असे भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या लेखी पत्रावरूनदेखील विरोधक भाजपाची कोंडी करण्याची शक्यता आहे. यामुळे गुरुवारी होणारी सर्वसाधारण सभा चांगली गाजण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे काम पूर्ण झाले नसताना सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाºयांनी अति घाईगडबड करून उद्घाटनाचा घाट घातला. यासाठी देशाचे उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परंतु भाजपाच्या गचाळ कारभारामुळे उद्घाटनाच्या कार्यक्रमातच सभागृहाला गळती लागली अन् महापालिकेची नाच्चकी झाली.तसेच अत्यंत थाटात उद्घाटन करताना योग्य नियोजन न केल्याने अनेक नगरसेवकांना व शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींना उपस्थित राहता आले नाही. यामुळेही अनेक सदस्य नाराज झाले असून, या भोंगळ कारभारावरून भाजपाला धारेवर धरण्यात येणार आहे.दरम्यान भाजपाचे शहराध्यक्ष यांनी महापौर मुक्ता टिळक यांना लेखी पत्र देऊन एखाद्या प्रस्तावावर निर्णय घेऊ नका, असे सांगणेचअत्यंत चुकीचे असून, पक्षाच्यावतीने थेट महापालिकेच्याकारभारात ढवळाढवळ सुरू केली आहे.याचादेखील जोरदार निषेध करून गोगावले यांच्या ‘एजंटगिरीवर खडाजंगी होण्याची शक्यता आहे. याशिवाय प्लॅस्टिकबंदीनंतर प्रशासनाकडून सुरू असलेल्या चुकीच्या कारवाईबाबतदेखील विरोधक सत्ताधाºयांना लक्ष्य करणार आहेत. यामुळे गुरुवारी होणारी मुख्यसभा चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.