वालचंदनगर : गोतोंडी (ता. इंदापूर) येथील गोतोंडी, निमगाव केतकीच्या मध्यवर्ती ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात बापूभाई ओढ्यावरील कालव्यावर पूल बांधण्यात आलेला आहे. या पुलाला गेल्या दहा-बारा वर्षांपासून सतत गळती होत आहे. हजारो-लाखो लिटर पाणी वाया जाताना दिसत आहे. सततच्या गळतीमुळे हा ब्रिटिशकालीन कालवा ढासळण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी वेळेत लक्ष दिल्यास कालव्याचा धोका टळणार असल्याचे बोलले जात आहे. गोतोंडी येथील गोतोंडी ते निमगाव केतकी कालव्यावर बापूभाई ओढ्यावर ब्रिटिशांनी कालव्यावर पूल बांधला आहे. या पुलावरून निमगाव केतकीला ५७ नंबरच्या कालव्याने शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. हा पूल दगडी घडीव कामाच्या माध्यमातून बांधकाम केला आहे. (वार्ताहर)
कालव्याच्या पुलाला गळती
By admin | Updated: February 23, 2017 02:14 IST