बारामती : माळेगाव (ता. बारामती) येथे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पत्त्याच्या क्लब जुगार अड्ड्यावर छापा टाकून १६ जणांकडून सुमारे १५ लाखांचा माल जप्त केला. ही घटना १३ मे राजी सायंकाळच्या सुमारास माळेगाव खुर्द येथील गोसावीवस्ती येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गुन्हा शाखेला खबऱ्यामार्फत खबर मिळाली की, माळेगाव खुर्द (ता. बारामती) गोसावीवस्ती येथे सोमनाथ गव्हाणे यांचे शेतात जुगार पत्त्यांचा क्लब खेळला जात आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने वेशांतर करून तेथे छापा टाकला. त्यावेळी पत्ते खेळत असलेल्या सोमनाथ सदाशिव गव्हाणे (वय ४२, रा. माळेगाव खुर्द, ता. बारामती), रमेश शंकर गायकवाड (वय ४० रा. एसटी स्टॅंड जवळ, बारामती), राजू शंकर जोगदंड (वय ४०, रा. शालिमार चौक, दौंड, ता. दौंड), अनिश विनायक मोरे (वय ३१, रा. आमराई, बारमती), संतोष दिनकर रोकडे (वय ४५, रा. सासपडे, जि. सातारा), अनिल बाळासाहेब माने (वय ४५ रा. सासपडे, ता. जि.सातारा), राजू शंकर गायकवाड (वय ४०, रा. एसटी स्टॅंड समोर, बारामती), कुलदीप बाळासाहेब जगताप (वय ३२, रा. सांगवी, ता. बारामती), महादेव आण्णा मासाळ (वय ५८, रा. मासाळवाडी लोणीभापकर, ता. बारामती), श्रीकांत श्रीनिवास उगले (वय ३४, रा. सासपडे, जि.सातारा), विजय बाबूराव मोरे (वय ४८, रा. कसबा, बारामती), फैयाज युनुस मुल्ला (वय ३१, रा. बुधवार पेठ ,फलटण, जि.सातारा), संतोष किसन शिंदे (वय ४२, रा. परंदवाडी, ता. फलटण, जि. सातारा), सुरेश शिवाजी शेलार (वय ४९ रा. आमराई, बारामती, ता. बारामती), विजय सुरेश देशमुख (वय १९, रा. आमराई, बारामती, ता. बारामती), विक्रांत अशोक अवधुते (वय २४, रा. चंद्रमणीनगर, बारामती) यांना ताब्यात घेतले.
या वेळी पोलिसांनी तेथील पत्त्यांचा डाव, १३ हजार ९५० रुपये रोख रक्कम, १ लाख १ हजार रुपये किमतीचे ११ मोबाईल, एक स्काॅर्पिओ, एक इर्टिगा, ४ मोटरसायकल अशी १४ लाख रुपयांची वाहने व ७ हजार ९०० रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण १५ लाख २२ हजार ८५० रुपये किमतीचा माल जप्त केलेला आहे.
जुगार खेळताना मिळून आलेले सोळा आरोपी विरुध्द बारामती तालुका पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी व जप्त मुद्देमाल बारामती तालुका पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला आहे. पुढील अधिक तपास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण व माळेगाव दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एच. विधाते हे करीत आहेत.
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,पोसई. अमोल गोरे, सफौ. दत्तात्रय जगताप, विजय माळी, पो.हवा. हनुमंत पासलकर, ज्ञानदेव क्षीरसागर, महेश गायकवाड, नीलेश कदम, सुभाष राऊत, काशिनाथ राजापुरे, पोलीस नाईक सागर चंद्रशेखर, गुरू गायकवाड, नितीन भोर, अभिजित एकशिंगे, पोलीस कॉन्सटेबल प्रसन्न घाडगे, बाळासाहेब खडके यांनी केलेली आहे.
————————————————