पुणे : विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) मागणी अर्जाची शिफारस करण्यासाठी तरुणाकडे दहा हजारांची लाच मागून ती स्वीकारत असताना पुणे महापालिकेच्या विधी पॅनलवरील वकिलाला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महापालिकेमध्ये शनिवारी दुपारी ही कारवाई केली. विलास दत्तात्रय होले (वय ५५, रा. ५५०, कस्तुरे चौक, गुरुवार पेठ) असे अटक वकिलाचे नाव आहे. होले सध्या करारावर २०१३ पासून महापालिकेच्या विधी विभागामध्ये नेमणुकीस आहे. दर अकरा महिन्यांनी हा करार पुन्हा करण्यात येतो. एसीबीकडे तक्रार दिलेला तरुण एका खासगी कंपनीमध्ये नोकरीस आहे. त्याची बालेवाडीला जागा आहे. यातील काही जागा रस्ता विस्तारीकरणामध्ये गेली होती. त्या जागेच्या टीडीआर मागणीसाठी त्यांनी महापालिकेमध्ये ७ मार्च २०१४ रोजी अर्ज दिला होता. हा अर्ज होले याच्याकडे अभिप्रायासाठी आलेला होता. हा टीडीआर द्यावा की न द्यावा याकरिता होलेकडे अर्ज आल्यानंतर त्याने सहा वेळा पत्र पाठवून विविध कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)‘‘तुमचे काम करणार नाही. कामासाठी दहा हजार रुपये लागतील, ते दिले तरच काम करीन’’ असे होले यांनी, सांगितल्यामुळे या तरुणाने एसीबीकडे ५ मार्च रोजी तक्रार दिली. त्यानुसार एसीबीने शनिवारी दुपारी सव्वाच्या सुमारास महापालिकेच्या विधी विभागात सापळा रचला. या प्रकरणाची शिफारस करण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना होले याला रंगेहाथ पकडण्यात आले.मारणे टोळीच्या गुंडाला अटककुख्यात नीलेश घायवळ टोळीच्या एका गुन्हेगाराला मारण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गजा मारणे टोळीच्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे जप्त केली आहेत. शेखर वाल्मीक सावंत (वय २९, रा. धनकवडी), अजिंक्य ऊर्फ सनी साहेबराव पवार (वय २५, रा. बिबवेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. सावंत आणि पवार बाजीराव रस्त्यावरील बँकेजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती.
वकिलाला लाच घेताना पकडले
By admin | Updated: March 8, 2015 00:56 IST