शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यात स्त्री आधार केंद्रातर्फे व्यासपीठ सुरु करणार - नीलम गो-हे                      

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 21:01 IST

राज्यात जिथे जिथे महिलाविषयक कामाची गरज आहे अशा भागात स्त्री आधार केंद्राच्या वतीने मुक्ता व्यासपीठ नावाने नवीन व्यासपीठ सुरु करण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलाविषयक कायद्याची माहिती देण्यात येणार आहे.

 पुणे :  राज्यात जिथे जिथे महिलाविषयक कामाची गरज आहे अशा भागात स्त्री आधार केंद्राच्या वतीने मुक्ता व्यासपीठ नावाने नवीन व्यासपीठ सुरु करण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलाविषयक कायद्याची माहिती देण्यात येणार आहे. अत्याचारग्रस्त महिलांच्या पाठीशी उभे राहून याबाबतच्या आवश्यक धोरणात्मक बाबींचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे', असे प्रतिपादन आज स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आ. डॉ. नीलम गो-हे यांनी येथे केले. केंद्राच्या ३४ व्या वर्धापनदिन व  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८७ व्या जयंतीनिमित्त 'महिला सक्षमीकरणाच्या नव्या दिशा ' या विषयावर परिसंवादाचे आयोजन सारसबागेजवळील बाळासाहेब ठाकरे कलादालनात केले होते.  त्या म्हणाल्या,  'सावित्रीबाईंनी केलेल्या महान कार्यामुळेच भारतीय स्त्रियांनी आज विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. संस्थेच्या माध्यमातून महिलाकरिता मागील ३४ वर्ष‍ात अनेक उपक्रम घेण्यात आले आहेत. मुली व मुलांशी संवाद साधण्यात येणार आहे. यावेळी केंद्राच्या वतीने तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा व द्विभार्या विवाह पध्दतीला विरोध व दखलपात्र गुन्हा करावा अशी मागणी करण्यात आली. राज्य पातळीवर ११ जिल्हयातील व्यासपीठाची घोषणा करण्यात आली.

वाहतूक विभागाचे सहाय़्यक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे म्हणाले, 'महिलांच्या समाजातील असमान वागणूक मिळण्याला पुरुषी मानसिकताच कारणीभूत आहे. महिलांच्या तक्रारी या महिला अधिका-यांकडेच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १०९१ या मोफत क्रमांकावर तक्रार नोंदीची व्यवस्था आहे. दामिनी पथकेही शहरी भागात कार्यरत आहेत. ग्रामीण भागात मात्र याविषयी आणखी प्रभावी कामाची गरज आहे. महिलांबाबत समानतेवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते.'          दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस आयुक्त भानूप्रताप बर्गे म्हणाले , 'आपल्या आजूबाजूला महिलांना विविध  प्रकारची प्रलोभने दाखवून गैरमार्गाने जात असल्याच्या घटना घडत आहेत. आंतर राष्ट्रीय पातळीवर  अशा काही प्रकारच्या शक्ती काम करतात. नागरिकांनी याबाबत पोलिसांना वेळीच माहिती दिल्यास यावर उपाययोजना करता येतात. धार्मिक विद्वेष पसरवून विपरीत मार्गाला घेऊन जाणा-या शक्तींचा बिमोड करता येतो. लव्ह जिहादसारख्या घटनांना आळा घातला पाहिजे. अनेक आत्मसमर्पण केलेल्या मुलींना पुन्हा समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे प्रयत्नदेखील पोलिस करीत आहेत.' स्त्री विकास विषयाच्या तज्ज्ञ सतलज दिघे यांनी उपस्थित महिलांची गटचर्चा  घेतली .    

यावर सादरीकरण करतांना केंद्राच्या वतीने देण्यात आलेल्या छोटया छोटया गोष्टीचे प्रशिक्षण फार उपयुक्त होत आहे. काम करतांना आपापल्या भागात काम करण्याचा प्रयत्न केला. कायदयांची माहिती मिळाली.  काम करतांना सोशल नेटवर्कचा वापर व्हावा. पोलिसांचे असहकार आहे. सिंहगड भागात महिला दक्षता समिती नाही. जागरुक व सुशिक्षित  महिला त्यात असाव्यात. अशी मते महिलांनी यावेऴी व्यक्त केली.   या कार्यक्रमाला स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, ज्योती कोटकर,  मीनाताई ईनामदार, म्रुणालिनी कोठारी, अॅड. कल्पना निकम, शेलार गुरुजी, विभावरी कांबळे, अनिता शिंदे, प्रिया नारिंगे, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी शिंदे, अनिता परदेशी, गीता वर्मा, पद्मा सोरटे, कविता आम्रे आदी उपस्थित होत्या.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे