शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हसविणे म्हणजेच समाजसेवा

By admin | Updated: May 10, 2017 04:21 IST

ताणतणावांचा सामना करणाऱ्या समाजाला विडंबन आणि विनोदाच्या माध्यमातून हसविणे म्हणजे एक प्रकारची समाजसेवाच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी येथे व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ताणतणावांचा सामना करणाऱ्या समाजाला विडंबन आणि विनोदाच्या माध्यमातून हसविणे म्हणजे एक प्रकारची समाजसेवाच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी येथे व्यक्त केले.रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ हास्यकवी आणि एकपात्री कलावंत बण्डा जोशी यांच्या हास्यकवितांच्या कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तेंडुलकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जागतिक हास्यदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर उपस्थित होते. या वेळी जोशी यांच्या हास्यकवितांचा ‘चला, हशा येऊ द्या !’ हा कार्यक्रम झाला. तेंडुलकर म्हणाले, ‘‘पूर्वीच्या काळात गंभीर राहण्याची वृत्ती होती. मात्र आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्यामुळे महाराष्ट्र खळखळून हसायला शिकला. विडंबन कविता आणि विनोदी कथांच्या माध्यमातून बण्डा जोशी ही परंपरा पुढे नेत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. अलीकडे विडंबनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून विडंबन म्हणजे मूळ लेखनावर केलेली टीका नसून त्या मूळ लेखनाच्या लोकप्रियतेला मिळणारी दाद असते. कारण काव्य किंवा लेखन लोकप्रिय असल्याशिवाय त्यावर विडंबन होत नाही.’’ माझ्या कारकिर्दीत रसिकांचा मोठा वाटा असून, त्यांच्या प्रतिसादाशिवाय ही कामगिरी अशक्य असल्याची भावना जोशी यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.