शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

दोन महिन्यांत उर्वरित ५० टक्के ऊसगाळपाचे आव्हान

By admin | Updated: January 28, 2015 23:35 IST

राज्यातील ९९ सहकारी व ७७ खासगी साखर कारखान्यांनी मिळून ४७१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी १०.७७ टक्के साखर उतारा ठेवला आहे.

महेश जगताप, सोमेश्वरनगरराज्यातील ९९ सहकारी व ७७ खासगी साखर कारखान्यांनी मिळून ४७१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी १०.७७ टक्के साखर उतारा ठेवला आहे. ५०७ लाख क्विंटल साखरपोत्यांचे उत्पादन झाले आहे. येत्या अडीच महिन्यांत अजून शेतातच उभा असलेल्या ४०० लाख टन ऊसगाळपाचे आव्हान राज्यातील साखर कारखादारीसमोर आहे. राज्यातील साखर कारखानदारी सुरू होऊन तीन महिने उलटले. मात्र, सर्व कारखान्यांनी मिळून ५५ टक्केच ऊस गाळप करण्यात यश मिळविले आहे. अजून ४५ टक्के ऊस शेतातच उभा आहे. गेल्या दोन वर्षापासून साखरेचे दर दिवसेंदिवस ढासळत असल्याने राज्यातील साखर कारखानदारी शॉर्ट मार्जीणमध्ये गेली आहे. गेल्या वर्षी साखर कारखानदारीला उर्जावस्था देण्यासाठी केंद्र शासनाने बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात कारखान्यांना मदत केली होती. गेल्या वर्षभरात साखरेचे दर वाढून साखर कारखनदारी शॉर्ट मार्जीणमधून बाहेर पडेल अशी कारखादारांबरोबरच ऊस उत्पादाकांना अशा होत्या. मात्र चालू वर्षी तर गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेची फारच बिकट परिस्थीती झाल्याने या वर्षीही साखर कारखानदारी मोठया अर्थिक संकटातून चालली आहे.राज्य बँकेने पोत्यावर दिलेली उचल आणि एफआरपी यातील फरक तोडणे साखर कारखानदारांच्या आवक्याबाहेर गेले आहे. कारखान्यांना एफआरपी देता यावी यासाठी गेल्या आठवडयात ऊस खरेदी कर (परचेस टॅक्स) ची रक्कम शासनाने माफ केली. यामुळे ऊस उत्पादाकांना एका टनाला ७० ते ८० रूपये वाढवून मिळतील असे असले तरीही ज्या कारखान्यांकडे सहवीजप्रकल्प आहेत, अशा कारखान्यांना याचा काडीचाही फायदा नसल्याचे म्हणणे कारखादारांचे आहे. ज्या कारखान्यांना सहवीजप्रकल्प नाहीत, अशा कारखान्यांना या परचेस टॅक्सचा फायदा होऊ शकेल. त्यामुळे या परचेस टॅक्सचा एफआरपी देण्यासाठी काहीच उपयोग होऊ शकत नाही. यासाठी केंद्राने कर्ज न देता टनाला ५०० ते ७०० रूपयांचे अनुदान जाहीर करावे अशी मागणी कारखानदार करत आहेत.