शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लासुर्णे परिसर ‘डेंगी’ तापाने फणफणला, ३००च्या वर रुग्ण; तालुका, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:07 IST

लासुर्णे (ता. इंदापूर) परिसरात डेंगी व विषाणुजन्य अजाराचा उद्रेक झाला आहे. दररोज नवीन रुग्ण भरती होत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक नसल्याचे चित्र आहे.

लासुर्णे : लासुर्णे (ता. इंदापूर) परिसरात डेंगी व विषाणुजन्य अजाराचा उद्रेक झाला आहे. दररोज नवीन रुग्ण भरती होत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक नसल्याचे चित्र आहे. मात्र, प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे. ग्रामपंचायतीने एकदा धूरफवारणी केली असली, तरी आजराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. फक्त लासुर्णे गावामध्येच ३००च्या आसपास संशयित रुग्ण असल्याचे या वेळी अढळले.इंदापूरच्या पश्चिम भागात डेंगीच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या भागातील खासगी दवाखान्यात रुग्ण अ‍ॅडमिट करून घेण्यास जागा उपलब्ध नसल्याने ओपीडी रूम, एक्स-रे रूम अशा ठिकाणी रुग्ण अ‍ॅडमिट असल्याचे चित्र दिसत आहे. लासुर्णे येथील एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरने आपल्या भागात शंभर ते दोनशे रुग्ण विषाणुजन्य आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले.यावर्षी पाऊस जास्त झाल्याने ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठली आहेत. या डबक्यात विषाणुजन्य आजारांच्या डासांची उत्पत्ती जास्त प्रमाणात होत आहे. या भागात डेंगी, चिकुनगुनिया, गोचिडताप यासारख्या आजाराने रुग्ण त्रस्त आहेत. इंदापूरच्या पश्चिम भागातील जंक्शन, लासुर्णे, बेलवाडी, परिटवाडी आदी भागातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.या भागातील खासगी दवाखान्यात रुग्णांची संख्या एवढी दिसून येत आहे की, दवाखान्यात कॉट शिल्लक नसल्याने चित्रसध्या पाहावयास मिळत आहे. प्रशासन मात्र याबाबत जबाबदारी झटकताना दिसत आहे.तालुक्यामध्ये दिवसेंदिवस आजारांचा उद्रेक सुरू असतानाही त्यावर उपाययोजना केल्याचेदिसून येत नाही.आजाराच्या उद्रेक काळातच लासुर्णे ग्रामपंचायतीच्या फॉगिंग मशीन नादुरुस्त आहेत. रोगराईच्या काळातच मशीन नादुरुस्त झाल्याने काही दिवसांपूर्वी भाडोत्री मशीन आणून फवारणी करण्याची नामुष्की लासुर्णे ग्रामपंचायतीवर आली होती. अद्यापही या मशीन नादुरुस्तच आहेत. एकदा फवारणी करूनदेखील डासांचा उपद्रव आवाक्यात आला नाही. ग्रामपंचायत पदाधिकारी देखील आपली उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहेत. याबाबत लासुर्णे गावच्या सरपंच निर्मला चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्या ग्रामपंचायतमधील फॉगिंग मशीन नादुरुस्त असल्याने आपण बाहेरून भाडोत्री मशीन मागवून सहा प्रभागात फॉगिंग मशीनने फवारणी केली आहे.जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाºयांना याबाबत सूचना दिल्या आहेत. ज्या भागात असे संशयित रुग्ण असतील त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सर्व्हे करावा, तसेच घरोघरी जाऊन डेंगीबाबत जनजागृती करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.- प्रवीण माने, जिल्हा आरोग्य व बांधकाम सभापती

टॅग्स :Puneपुणे