शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव बंधाऱ्यात मोठी पाणीगळती

By admin | Updated: January 31, 2017 03:51 IST

भामा-आसखेड धरणाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. नदीपात्रात वेळोवेळी सोडलेले पाणी गळक्या बंधाऱ्यातून

आंबेठाण : भामा-आसखेड धरणाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. नदीपात्रात वेळोवेळी सोडलेले पाणी गळक्या बंधाऱ्यातून वाहून जात असल्याने नदीच्या दुतर्फा असणारी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.भामा नदीवर भामा-आसखेड हे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या कालव्याचे काम रखडले असून धरणात जवळपास आठ टीएमसी पाणीसाठा होत असतो. पावसाळा संपल्यानंतर खालच्या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार आणि गरज असेल तेव्हा धरणातून पाणी सोडले जाते. त्यामुळे भामा नदीपात्राच्या कडेला असणाऱ्या शेतीची तहान भागते, तसेच नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजनादेखील सुरू राहतात. नदीपात्रात पाणी साचून राहावे, म्हणून ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत.परंतु अनेक ठिकाणी या बंधाऱ्याला बसविण्यात आलेले लोखंडी ढापे हे जीर्ण झाल्याने ते गळू लागले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात कितीही पाणी सोडले तरी ते वाहून जात आहे. जुने आणि जीर्ण झालेले ढापे बदलणे किंवा त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या पाण्याच्या भरवशावर भामा खोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांकडून बागायती शेती केली जात आहे. त्यामधून ऊस, पालेभाज्या, कांदापिक, तसेच अनेक नगदी पिकांचे उत्पन्न घेतले जात आहे. गळती थांबवली नाही तर या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजना बंद पडतील, तर विहिरींची पाणीपातळी कमी होईल. (वार्ताहर)