शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचे मोठे सावट, तलाव-बंधारे कोरडे ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:25 IST

पावसाची पाठ : पुरंदरच्या दक्षिण-पूर्व पट्ट्यातील अनेक तलाव-बंधारे कोरडे ठणठणीत

नीरा : कायम दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या पुरंदरचा दक्षिण-पूर्व पट्टा परतीच्या पावसातही हुकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेली दोन वर्षे सतत दुष्काळ पडल्याने बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. विहिरींच्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.

पुरंदर तालुक्यातील राख, कर्नलवाडी, वाल्हा गावच्या पूर्वेकडील अंबाजीचीवाडी, मुकादमवाडी, गायकवाडवाडी, नव्या निर्माण झालेल्या सुकलवाडी, वाघदरवाडीसह वाड्या-वस्त्यांवर सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. ऐन हंगामात विहिरींची पाणीपातळी घटल्याने शेतकºयांसमोर पुढील काळात भेडसावणाºया टंचाईसदृश परिस्थितीचे चित्र उभे राहिले आहे. सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी काढणी सुरू आहे. रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभºयाची पेरणी करावी की नाही असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. पावसाच्या आशेवर काही शेतकºयांनी कांदालागण केली आहे. पण अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याने कांदा उत्पादक संकटात सापडला आहे.पावसाळ्यापूर्वी वळवाच्या पावसाने सुरुवात चांगली झाली होती. पण मॉन्सूनच्या पावसाने पाठ फिरवली व नंतर परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. गतवर्षी पुरंदरच्या दक्षिण-पूर्व पट्ट्यात सरासरीच्या तुलनेत साठ टक्के पाऊस झाला होता. त्याचा परिणाम जानेवारीलाच जाणवू लागला होता. तशीच काही परिस्थिती आजच जाणवत आहे. वाल्हे गावच्या पूर्वेकडील रेल्वे लाईन जवळचे तळे, राख येथील फांज ओढ्यावरील बंधारा, ब्रिटिशकालीन तलाव,नावळी खिंडीतील एकाही तलावात पाणी दिसत नाही.लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावासुकलवाडी गावात यावर्षी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे काम झाले आहे. पण पाऊसच पडला नसल्याने सीसीटी बंधाºयात पाणी जमा झाले नाही. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शासनाने लवकरच दुष्काळ जाहीर करावा.- धनंजय पवार, उपसरपंच, सुकलवाडी

टॅग्स :Puneपुणे