शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा पोलिसांची दोन महिन्यात 925 वाहनांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 16:39 IST

लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने मागील दोन महिन्यात तब्बल 925 वाहनांवर कारवाई करत 3 लाख 29 हजार 400 रुपयांची दंड वसूली केली आहे.

ठळक मुद्देलोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने मागील दोन महिन्यात तब्बल 925 वाहनांवर कारवाई करत 3 लाख 29 हजार 400 रुपयांची दंड वसूली केली आहे. विना हेल्मेट वाहनं चालविणार्‍यांची संख्या सर्वांधिक आहे. तब्बल 287 दुचाकी चालकांवर कारवाई करत 1 लाख 44 हजार 800 रुपये दंड वसुल केला आहे.

लोणावळा, दि. 31-  लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने मागील दोन महिन्यात तब्बल 925 वाहनांवर कारवाई करत 3 लाख 29 हजार 400 रुपयांची दंड वसूली केली आहे. यामध्ये विना हेल्मेट वाहनं चालविणार्‍यांची संख्या सर्वांधिक आहे. तब्बल 287 दुचाकी चालकांवर कारवाई करत 1 लाख 44 हजार 800 रुपये दंड वसुल केला आहे.अवैध प्रवासी वाहतुक करणार्‍या 46 वाहनांवर कारवाई करत 50 हजार दंड वसूली, विना परवाना वाहन चालविणार्‍या 39 वाहनांवर कारवाई करत 20 हजार 400 रुपये दंड, ट्रिपल सिट वाहने चालविणार्‍या 177 वाहनांवर कारवाई करत 36 हजार 200 रुपये दंड, परवाना जवळ न बाळगणे 125 वाहनांवर कारवाई व 25 हजार 400 रुपये दंड, मोबाईल वर बोलत वाहन चालविणारे 11 जणांवर कारवाई करत 2200 रुपये दंड, फँन्सी नंबर प्लेट असणार्‍या 16 वाहनांवर कारवाई व 4 हजार 700 रुपये दंड, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणार्‍या 184 वाहनांवर कारवाई करत 45 हजार 700 रुपये दंड तर दारु पिऊन वाहन चालविणार्‍या तब्बल 40 जणांवर खटले दाखल करण्यात आले.

लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश माने, अनंत रावण, सुनिल मुळे, पोलीस नाईक सामिल प्रकाश, जीवन गवारी, पोलीस मदतनिस दर्शन गुरव, सतिष ओव्हाळ, अंकूश गायखे, प्रकाश मराठे यांच्या पथकाने ही कारवाई केली