शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची येरवड्यातील जमीन होणार शासनजमा, विनापरवाना भाडेतत्त्वावर : २ कोटी २० लाख रुपयांचा दंड; जिल्हाधिकाºयांच्या आदेशामुळे नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 02:39 IST

पुणे महापालिकेला देण्यात आलेली येरवड्यातील २ हेक्टर ४० आर जमीन सरकारजमा होणार असून, ही जमीन शासनाने शाळा व क्रीडांगणासाठी दिलेली होती.

पुणे : पुणे महापालिकेला देण्यात आलेली येरवड्यातील २ हेक्टर ४० आर जमीन सरकारजमा होणार असून, ही जमीन शासनाने शाळा व क्रीडांगणासाठी दिलेली होती. शाळेची इमारत वगळता सर्व जागा ताब्यात घेतली जाणार आहे. ८० आर जमीन पालिकेने सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅफ अ‍ॅडव्हान्स कम्प्युटींग (सी-डॅक) या संस्थेला विनापरवाना भाडेतत्त्वावर दिल्याने जिल्हा प्रशासनाने पालिकेला २ कोटी २० लाखांचा दंड केला आहे. हा दंड शासनाकडून मिळणाºया अनुदानामधून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी दिली.जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी याप्रकरणी आदेश दिले असून, पालिकेवर नामुष्की ओढवली आहे. शासनाने १५ वर्षे मुदतीने एक रुपया वार्षिक भाडेतत्त्वावर २३ सप्टेंबर १९९२ रोजी येरवड्यातील सर्व्हे क्रमांक ११५/२ मधील दोन हेक्टर ४० आर जमीन महापालिकेला दिली होती. शाळा आणि क्रीडांगण मिळालेल्या या जमिनीच्या भाडेपट्ट्याची मुदत २००७ मध्ये संपली. पालिकेने त्यातील ८० आर जमीन २००२मध्ये सी-डॅकला भाडेतत्त्वाने दिली. जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी बजावलेल्या नोटिशीला पालिकेने कोणतेही उत्तर दिले नव्हते. पालिकेने सी-डॅककडून तब्बल ७२ लाख ६ हजार रुपये भाडे वसूल केले. त्यावर व्याज आकारून २ कोटी २० लाख २८ हजार रुपये शासनजमा करण्याचे जिल्हा प्रशासनाने सुचविल्यानंतरही त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी जमीनच शासन जमा करण्याचे आदेश काढले.सी-डॅककडून पालिकेने भाडे घेतले आहे. व्याजासह २ कोटी २० लाखांची रक्कम वसूल करण्यात आली असून, राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पालिकेसाठी दिल्या जाणाºया अनुदानातून ही रक्कम वजा करून उर्वरित अनुदान पालिकेला देण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले. एखाद्या संस्थेला शासकीय जमीन दिल्यानंतर तिचा वापर संस्थेनेच करारात नमूद केल्याप्रमाणे केला पाहिजे. पालिकेने अटी व शर्तींचा भंग केला असून जमीन व्यापारी तत्त्वावर देण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक होते, असेही मुठे म्हणाले.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे