या प्रकरणी
तुळसाबाई महादु बागडे (वय ७५ रा. पाडळी, ता. खेड )यांनी फिर्याद दिली. त्या वाडा रस्त्याजवळीत मंदिरा शेजारी दुपारी शेतात शेळ्या चरावयास घेऊन गेल्या होत्या. यावेळी दोघे मोटारसायकलवर आले. त्या दोघांनी बागडे यांना जवळ असलेल्या कानिफनाथ मंदिरातील देवाला हस्ते हार फुले वाहयाची आहे. ती एका बाईकडून वाहयची आहेत, असे सांगुन त्याचा विश्वास संपादित केल्या. बागडे यांच्या हातात युवकांनी हार, फुले, उदबत्ती, नारळ यांची पिशवी देऊन त्यांना मंदिरात नेले. पुजा करण्यासाठी त्या वाकल्या असता दोघांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रूपयांचे दिड तोळ्याचे सोन्याचे दागिने ओढत दुचाकीवरुन पळून गेले. पुढील तपास पोलिस हवालदार संतोष मोरे करित आहे.