खेडेकर यांचे जारकरवाडी फाटा येथे रसवंती गृह व किराणा मालाचे दुकान असून रविवारी नेहमीप्रमाणे ते आपले दुकान बंद करून घरी आले होते. त्यानंतर दि. १ मार्चला ते सकाळी सात वाजता आपले दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या छताचा पत्रा त्यांना उचकटलेला दिसला. त्यावेळी त्यांनी आत जाऊन पाहिले असता किराणा साहित्य व सीसीटीव्ही मशीन, रसाचे मशीन अज्ञाताने लंपास केल्याचे निदर्शनास आले. या चोरीत ३० हजार रुपये किमतीचे उसाच्या रसाचे मशीन ,१५ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही,डी.व्ही.आर मशीन व २५ हजार रुपये किंमतीचे किराणा साहित्य असे एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक हागवणे करत आहे.
जारकरवाडी फाटा येथे ७० हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:11 IST