शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ढिसाळ कारभाराचा लालमहालाला फटका; सुशोभिकरणाच्या नावाखाली चार वर्षांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 11:17 IST

शिवाजीमहाराजांच्या जडणघडणीतील महत्त्वपूर्ण व शाहिस्तेखानाची बोटे जेथे छाटली गेली असा हा लालमहाल इतिहासाच्या पुस्तकातून संपूर्ण जगासमोर आहे़

ठळक मुद्दे लालमहाल पुणेकरांसह शहराबाहेरून येणाऱ्या पर्यटकांना केवळ दूरून दर्शन साजरेगेल्या ४ वर्षांपासून लालमहालाबाहेरील ‘सुशोभीकरण व दुरुस्तीचे काम चालूपालिकेच्या भवन विभागाकडून लालमहालाच्या नूतनीकरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा

पुणे : छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जीवनावर आधारित कोट्यवधी रुपयांची शिवसृष्टी उभारण्याच्या वल्गना करणाऱ्या पुणे महापालिकेने, गेल्या चार वर्षांपासून सुशोभिकरणाच्या नावाखाली पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारा लालमहाल बंद ठेवला आहे़. निधीच्या अर्धवट तरतुदी, निधी उपलब्ध करूनही त्याचा वेळेत उपयोग न करणे, कासवगतीने सुरू असलेले काम व काम पूर्णत्वास नेण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव यामुळे हा लालमहाल पुणेकरांसह शहराबाहेरून येणाऱ्या पर्यटकांना केवळ दूरून दर्शन साजरे असाच ठरत आहे़..शिवाजीमहाराजांच्या जडणघडणीतील महत्त्वपूर्ण व शाहिस्तेखानाची बोटे जेथे छाटली गेली असा हा लालमहाल इतिहासाच्या पुस्तकातून संपूर्ण जगासमोर आहे़. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून तो अनेक वादांमध्ये पोलीस बंदोबस्तात व काटेरी तारांच्या कुंपणातच राहिला़. लालमहालातील शिल्पाचा वाद मिटल्यावर याच्या सुशोभीकरणाचा विषय चर्चिला गेला आणि लालमहाल विकासाचा मास्टर प्लॅनही तयार झाला़. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात लालमहालाच्या विकासाकरिता ५० लाख रुपयांची तरतूद केली गेली. अखेर २०१६ मध्ये या सुशोभीकरणाला प्रारंभ झाला़. एका वर्षाच्या आत सुशोभित व दुरुस्ती केलेला लालमहाल पर्यटकांसाठी उपलब्ध होईल, असे बोलले गेले, परंतु घडले उलटेच. गेल्या ४ वर्षांपासून लालमहालाबाहेरील ‘सुशोभीकरण व दुरुस्तीचे काम चालू असल्याने लालमहाल बंद आहे’ हा फलकच पर्यटकांना दिसत आहे़. सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पातील तरतुदीनंतर पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली़. मात्र, पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे व टेंडर प्रक्रियेतील कासवगती यामुळे हा निधी पूर्णपणे वेळेत खर्च झाला नाही़. यामुळे तरतुदीपैकी ५० लाख रुपये लॅप्स झाले़ याचवर्षी लालमहालातील विद्युतविषयक कामांकरिताही ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती़. परंतु, तीही अद्याप खर्ची पडलेली नाही़.  सन २०१८-१९ च्या पालिकेच्या अर्थसंकल्पात या लालमहालाच्या कामाकरिता निधीची तरतूदच नसल्याने पालिकेच्या भवन विभागासही हातावर हात धरून बसण्याशिवाय पर्याय उरला नाही़. यामुळे सात ते आठ महिने हे काम पूर्णपणे बंद होते़. सद्य:स्थितीला पालिकेच्या भवन विभागाकडून लालमहालाच्या नूतनीकरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे़.  .........चारवेळा ठेकेदार बदललेलालमहालाच्या नूतनीकरणाच्या कामाकरिता आत्तापर्यंत चारवेळा ठेकेदार बदलेले गेले आहेत़. वेळेत निधी मिळत नसल्याने त्यांच्याकडूनही हे काम होत नाही़.

..........पालिकेचा हलगर्जीपणाच जबाबदार लालमहाल नूतनीकरणाकरिता आम्ही भरीव तरतूदीची मागणी अर्थसंकल्पात केली़. मात्र, या कामाकरिता तुकड्या -तुकड्याने निधी दिला गेला़ पर्यायाने हे काम रखडले गेले़. गेल्या चार वर्षांपासून हा लालमहाल नूतनीकरणाच्या नावाखाली बंद आहे़ .यास केवळ पालिकेचा हलगर्जीपणा व ढिसाळ कारभारच जबाबदार आहे़. रविंद्र धंगेकर, बाळा शेडगे़ 

.........पुणे दर्शनमध्ये बाहेर गावच्या पर्यटकांना या लालमहालात सध्या नेले जात नाही़. केवळ शनिवावाडा येथे या पर्यटकांना शेजारी लालमहाल आहे हे सांगितले जाते़ .कित्येक दिवस नुतकीकरणामुळे हजारो पर्यटक लालमहालापासून दूर राहिले गेले आहेत़.