शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टर शोध समिती बैठकीला लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:26 IST

द्विसदस्यीय समितीच उदासीन : ४ महिन्यांपासून आयुक्तांसोबतच भेट नाही

पुणे : एकीकडे शहरामध्ये बोगस डॉक्टरांची संख्या वाढत चाललेली असताना त्यावर अंकुश ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आलेली द्विसदस्यीय समितीच उदासीन असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या ‘बोगस डॉक्टर शोध समिती’ची गेल्या चार महिन्यांत एकही बैठक झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्वत: महापालिका आयुक्त अध्यक्ष असलेली समितीच बोगस डॉक्टरांबाबत किती ‘जागरूक’ आहे याचा प्रत्यय येत आहे.

शासनाच्या निर्देशांनुसार बोगस डॉक्टर शोध समितीची स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष महापालिका आयुक्त असतात, तर सदस्य सचिव म्हणून पालिकेचे आरोग्यप्रमुख यांची पदसिद्ध नेमणूक असते. आरोग्यप्रमुखांना सहायक आरोग्यप्रमुखांनी या कामात मदत करणे अपेक्षित आहे. या द्विसदस्यीय समितीची महिन्यातून एक तरी बैठक होणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांत एकही बैठक झालेली नाही.

कारवाईचा अजेंडा ठरविणे, त्याची कार्यपत्रिका, केलेल्या कारवायांची माहिती आदींविषयी या बैठकीमध्ये साधकबाधक चर्चा होते. महापालिका आयुक्तांनी लोकशाही दिन झाल्यानंतर यासंदर्भात बैठक घेण्याच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, आयुक्तांच्या सूचनांनाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. नवीन कारवाया करणे, त्याचे नियोजन, तक्रारींच्या अनुषंगाने कारवाई करणे, न्यायालयातील प्रलंबित खटले, झालेल्या शिक्षा यांविषयी सूचना आणि चर्चा या समितीकडून अपेक्षित आहेत. बोगस डॉक्टरांवर अंकुश ठेवणे आणि त्यांची प्रॅक्टिस थांबविण्याचे आव्हान पालिकेच्या आरोग्य विभागापुढे आहे. 

आम्ही आरोग्य विभागामध्ये पीसीपीएनडीटी आणि बोगस डॉक्टरसह विविध विषयांना स्वतंत्र अधिकारी नेमलेले आहेत. मी सूत्रे स्वीकारल्यानंतर बैठक झाली नसली तरी यापूर्वी झालेल्या बैठकांचे अहवाल मागविले आहेत. आजवर किती कारवाया झाल्या, न्यायालयातील प्रलंबित खटले, किती जणांना शिक्षा झाल्या याची माहिती मागविण्यात आली आहे. यासोबतच पालिकेच्या धडक मोहिमा सुरू आहेत. धाडी टाकण्याचे आणि तक्रारींच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे कामही सुरू आहे. अहवाल मिळाल्यानंतर समिती अध्यक्ष असलेल्या आयुक्तांसमवेत बैठक घेण्यात येईल.- डॉ. रामचंद्र हंकारे,आरोग्यप्रमुख, पुणे महानगरपालिका